Join us  

बॉलिवूडचा आणखी एक संसार मोडणार, इमरान खान व अवंतिका घटस्फोट घेणार?  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 5:51 PM

Imran Khan Divorce: मनोरंजन विश्वातून सतत घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सोहेल खान व त्याची पत्नी सीमा सचदेव यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आता आणखी एक बॉलिवूड कपल घटस्फोट घेणार असल्याचं कळतंय.

Imran Khan Divorce: मनोरंजन विश्वातून सतत घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सोहेल खान व त्याची पत्नी सीमा सचदेव यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आता आणखी एक बॉलिवूड कपल घटस्फोट घेणार असल्याचं कळतंय. होय, बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खान (Imran Khan) व त्याची पत्नी अवंतिका दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. दोघंही दीर्घकाळापासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.

इमरान खान तूर्तास तरी बॉलिवूडमधून गायब आहे. 2015 साली तो ‘कट्टी बट्टी’ या सिनेमात अखेरचा झळकला होता. इंडस्ट्रीत काम मिळत नसल्यानं तो आर्थिक संकटाचा सामना करत असल्याच्याही चर्चा होत्या.  मागच्या काही काळापासून इमरान  पत्नीसोबत बिघडलेल्या संबंधांमुळे अधिक चर्चेत आहेत.

2011 साली इमरानने अवंतिका मलिकसोबत लग्न केलं होतं. दोघांना 7 वर्षांची एक मुलगी आहे. 2019 दोघांत बिनसल्याचं पहिल्यांदा समोर आलं होतं. दोघांच्याही कुटुंबीयांनी हे नातं वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. इमरान व अवंतिका यांच्यातील संबंध सुधारण्याऐवजी आणखीच बिघडत गेलेत.  वाद संपण्याचं नाव घेत नसल्यानं आता या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.  मात्र अद्याप त्यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला नाही.

 13 जानेवारी 1983 रोजी जन्मलेल्या इमरानने 2008 मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. आमिरचा भाचा म्हणून त्याच्या या डेब्यूची चांगलीच चर्चा झाली होती. पण पुढे इमरानच्या नावावर अनेक फ्लॉप सिनेमे जमा झालेत आणि त्याच्या  फ्लॉप सिनेमांसाठीच तो ओळखला जाऊ लागला.  आता तर त्याला ओळखणंही मुश्किल झालं आहे. होय, अलीकडे इमरानच्या ईद सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले होते. आमिर खानची लेक इराने हे फोटो शेअर केले होते. यात  इमरान  अगदीच बदलेला दिसला. अगदी त्याला ओळखंणही कठीण झालं.

टॅग्स :इम्रान खानआमिर खानबॉलिवूड