Join us

अभिनेत्रीच्या प्रेमापोटी प्रेग्नंट पत्नीला दिला घटस्फोट; ३ संसार मोडल्यानंतर असा झाला अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 7:00 AM

Inder kumar: इंदरच्या पहिल्या पत्नीने एका मुलाखतीत तिच्या आणि इंदरच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

कलाविश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांचं निधन अनेकांच्या हृदयाला चटका लावून गेलं आहे. यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन, जिया खान आणि इंदर कुमार या कलाकारांची आवर्जुन नाव घेतली जातात. यामध्येच आज अभिनेता इंदरकुमार याच्याविषयी जाणून घेऊयात. एकेकाळी सलमान खानला टक्कर देणाऱ्या या अभिनेत्याचं आयुष्य प्रचंड वादग्रस्त राहिलं. विशेष म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्री त्याने त्याच्या प्रेग्नंट पत्नीला घटस्फोट दिला. मात्र, शेवटच्या दिवसात त्याला एकट्यालाच आयुष्यात रहावं लागलं.

बॉलिवूड ‘हँडसम हंक’ म्हणून इंदर कुमार ओळखला जात होता. इंदर त्याच्या फिटनेस आणि लुक्ससाठी ओळखले जात होता. इतकंच नाही तर बॉडी आणि लुक्सच्या बाबतीत तो सलमान खानलाही टक्कर देत होता. मात्र, 2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. इंडस्ट्रीत सलमानचा जिगरी अशी ओळख असलेल्या इंदरने सलमानसोबत ‘तुमको ना भूल पाएंगे’ आणि ‘वॉन्टेड’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

इशा कोप्पीकरमुळे दिला पत्नीला घटस्फोट

एकेकाळी इंदर, इशा कोप्पीकरच्या प्रेमात पार वेडा झाला होता. इतकंच नाही तर तिच्यासाठी त्याने त्याच्या प्रेग्नंट पत्नीला घटस्फोटही दिला. याविषयी त्याच्या पत्नीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. इशा आणि इंदर यांनी १९९८ मध्ये एक था दिल एक थी धडकन या सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर इंदर तिच्या प्रेमात पडला होता. 

इशापासून वेगळा झाल्यानंतरही इंदर तिच्या प्रेमात होता. इशा सोबत घालवलेला कोणताही काळ तो विसरु शकत नव्हता. त्यामुळे आमच्या लग्नानंतरही तो इशाच्या संपर्कात होता. आमच्या घटस्फोटामागेही तीच कारणीभूत होती, असं इंदरची पत्नी सोनल करियाने एका मुलाखतीत सांगितलं. सोनल प्रेग्नंट होती त्याच काळात तिचा आणि इंदरचा घटस्फोट झाला. सोनल प्रेग्नंट असल्याचं तिने इंदरला सांगितलं होतं. मात्र, त्याच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने या काळातही तिच्याकडे दुर्लक्ष केलं. ज्यामुळे सोनल कोसळून गेली आणि तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला.

एकीकडे इंदरची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. त्याला काम मिळणं बंद झालं होतं. ज्यामुळे तो मानसिक तणावाखाली आला होता. यामध्येच त्याला मुलगी झाली. ही माहिती सोनलने इंदरला मेसेजद्वारे कळवली होती. मात्र, त्याने त्या मेसेजचा काहीच रिप्लाय दिला नाही. तो व्यसनांच्या आहारी गेला होता. काम मिळत नसल्यामुळे नैराश्यात गेला होता.

दरम्यान, इंदरने सोनलला घटस्फोट दिल्यानंतर २०९ मध्ये कमलजीत कौरशी लग्न केलं. मात्र, त्यांचा संसारही फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्याने २०१३ मध्ये पल्लवी सराफसोबत लग्न केलं. परंतु, त्याचं हे नातंही फार काळ टिकलं नाही. २०१७ मध्ये ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर २८ जुलै २०१७ मध्ये इंदरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमासलमान खानइशा कोप्पीकर