बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ हा 'बॉलिवूडचा भिडू' म्हणून ओळखले जातात. विनोदी शौलीनं ते अनेकांची मनं जिंकतात. जॅकी श्रॉफ हे तसे बॉलिवूडचं मोठं नाव. पण, इतकं यश आणि प्रसिद्धी मिळवून देखील ते नेहमीच आपल्या मातीशी नाळ जोडून राहिलेले दिसतात. नुकतेच जॅकी श्रॉफ यांचा PETA तर्फे सन्मान करण्यात आला आहे.
जग्गू दादा अनेकदा प्रत्येक कार्यक्रमात हातात रोप घेऊन पाहायला मिळाले आहेत. ऑक्सिजन ही कोणत्याही व्यक्तीसाठी एक खास भेट आहे, म्हणून ते रोपटे भेट म्हणून देतात. या कारणांमुळे त्यांना पेटाने सन्मानित केले आहे. PETA तर्फे जग्गू दादाचा ‘मोस्ट ब्युटीफुल व्हेजिटेरियन सेलेब्रिटी ऑफ 2023’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
जॅकी श्रॉफ म्हणाले, 'या पुरस्कारासाठी मी पेटा इंडियाचा खूप आभारी आहे. मला नेहमीच निरोगी जीवनशैली पाळणे आवडते. शाकाहार हा एक निरोगी पर्याय आहे. याबद्दल अशी पावती मिळाल्याने मला खूप चांगले वाटले. हे जग आपण आलो, तेव्हा जसे होते. त्याहीपेक्षा आपण ते आणखी चांगले केले पाहिजे, असे अनेकदा म्हणत असतो. आता हा पुरस्कार म्हणजे मी योग्य मार्गावर आहे, हे स्पष्ट करतो'.
बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख असलेले जॅकी श्रॉफ केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही तर समाजात चांगले काम करण्यासाठीही ओळखले जातात. इतकेच नाही तर त्यांच्या शाकाहारी जेवणाच्या रेसिपीही सोशल मीडियावर व्हायरल होतात. या शर्यतीत जॅकी श्रॉफने अनुष्का शर्मा आणि जॉन अब्राहमला मागे टाकले आहे. एवढेच नाही तर या पुरस्कारासाठी जॅकी श्रॉफ यांना सर्वाधिक मतेही मिळाली.