Corona: सर्वांनी 10-10 कोटी द्यावेत, सगळा पब्लिकचाच माल!! केआरकेने नेत्यांवर साधला निशाणा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 04:33 PM2020-03-27T16:33:42+5:302020-03-27T16:35:03+5:30

क्षणात व्हायरल झाले केआरकेचे हे ट्विट

actor kamaal r khan says politician to donate atleast 10 corore for battle with coronavirus-ram | Corona: सर्वांनी 10-10 कोटी द्यावेत, सगळा पब्लिकचाच माल!! केआरकेने नेत्यांवर साधला निशाणा!!

Corona: सर्वांनी 10-10 कोटी द्यावेत, सगळा पब्लिकचाच माल!! केआरकेने नेत्यांवर साधला निशाणा!!

googlenewsNext
ठळक मुद्देभारतात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढताना दिसतेय. 

कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग थांबलेय. भारतातही 21 दिवसांचे लॉकडाऊन आहे. भारतातील लोकांनी सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाला पूरेपूर पाठींबा दिलाय. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. अभिनेता प्रभासने नुकतीच कोरोनाग्रस्तांसाठी 4 कोटी रूपये देण्याची घोषणा केलीय. कपिल शर्माने 1 कोटी दिले. हृतिक रोशन, रजनीकांत अशा अनेकांनीही मदत दिली. अशात बॉलिवूड अभिनेता व निर्माता कमाल आर खान अर्थात केआरके याने मात्र एक वेगळेच ट्विट केले. केआरकेचे हे ट्विट क्षणात व्हायरल झाले.


आपल्या ट्विटमध्ये केआरकेने भारतातील राजकीय नेत्यांना लक्ष्य केले आहे. होय, देशातील प्रत्येक नेत्याने मदतनिधीत प्रत्येकी दहा कोटी रूपये द्यावेत. कारण शेवटी या नेत्यांकडे आज जे काही आहे, ते सगळे पब्लिकचेच तर आहे, असे केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
केआरकेचे हे ट्विट क्षणात व्हायरल झाले. नेटक-यांनी त्याच्या या ट्विटवर भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. एका युजरने यावर मोठी मजेशीर प्रतिक्रिया दिली.

‘अब दुनिया पक्का खत्म होने वाली है, ये बंदा भी समझदारी की बात करने लगा है,’ असे या युजरने लिहिले. म्हणजेच अनेकांनी केआरकेच्या या ट्विटचे समर्थन केले. काहींनी मात्र यावरून केआरकेला ट्रोल केले.

राजकीय नेत्यांना द्यायला सांगतोस, तू किती दिलेस? असा सवाल अनेकांनी यानिमित्ताने त्याला केला.  तर अनेकांनी हाच न्याय तुलाही लागू होतो, असे  बजावले.

1-2 लाख तू सुद्धा दे, असे एका युजरने कमेंट करताना लिहिले.
 भारतात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढताना दिसतेय. कोरोना पॉझिटीव्हचा देशातील आकडा 700 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने सगळ्यांच्याच चिंता वाढल्या आहेत.

Web Title: actor kamaal r khan says politician to donate atleast 10 corore for battle with coronavirus-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.