आरएसवीपी आणि बावेजा स्टूडियोज 'कॅप्टन इंडिया'सोबत इतिहासातील सर्वात यशस्वी बचाव मोहिमांमधील एक मोहीम पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेने प्रेरित असून भारताच्या सर्वात मोठ्या आणि यशस्वी बचाव मोहिमेवर आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याद्वारे दिग्दर्शित आणि रोनी स्क्रूवाला व हरमन बावेजाद्वारे निर्मित, हा प्रेरक एक्शन-ड्रामा असून यात कार्तिक आर्यन एका शूर आणि साहसी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.
या विषयी बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला की, 'कॅप्टन इंडिया' एकाच वेळी प्रेरणादायक आणि रोमांचकारी चित्रपट आहे आणि त्याच्यासोबत मला आपल्या देशाच्या अशा एका ऐतिहासिक अध्यायाचा भाग बनता आले, हा माझा सन्मान असून याचा मला अभिमान आहे. हंसल सरांच्या कामाप्रति माझ्या मनात खूप आदर असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठीची ही योग्य संधी आहे.”
चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात की, "'कॅप्टन इंडिया' सत्य घटनेपासून प्रेरित असून एका अशा घटनेला चित्रित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपले दुःख आणि वेदना बाजूला सारून हजारों लोकांचे प्राण वाचवतो. मला या चित्रपटासाठी रोनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा यांच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे आणि मी कार्तिकसोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे."
रोनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा यांच्याद्वारे निर्मित, बावेजा स्टूडियोजचे विक्की बाहरी यांची सह-निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये आरएसवीपीतर्फे सोनिया कंवर एसोसिएट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. 'कॅप्टन इंडिया'चे चित्रीकरण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला सुरू होणार आहे.