Join us

'काजोलसोबत इंटिमेट सीन करताना...' कुमुद मिश्रांनी शेअर केला Lust Stories 2 चा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:21 PM

या सिनेमात काजोलची भूमिका आश्चर्यचकित करणारी आहे.

लस्ट स्टोरीज 1 (Lust Stories 1) च्या यशानंतर नुकताच लस्ट स्टोरीज 2 (Lust Stories 2) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. बोल्ड विषय आणि इंटिमेट दृश्यांसाठी सिनेमा चर्चेत आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही अनेक इंटिमेट सीन्स आहेत. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. तर कोंकणा सेन शर्माच्या दिग्दर्शनाचं कौतुक होतंय. मात्र या सिनेमात काजोलची भूमिका आश्चर्यचकित करणारी आहे. काजोल (Kajol) आणि अभिनेता कुमुद मिश्रा (Kumud Mishra)दोघंही कधी न दिसलेल्या अवतारात दिसत आहेत. सिनेमात काम करण्याचा अनुभव कुमुद मिश्रा यांनी नुकताच शेअर केला.

आज तकला दिलेल्या मुलाखतीत कुमुद मिश्रा म्हणाले ,'जेव्हा सिनेमाची स्क्रीप्ट आली तेव्हा मला फार मजेदार वाटली. मी अशी भूमिका याआधी कधीच केली नव्हती.  मी आधी दिग्दर्शकाला भेटलो आणि आमच्यात चर्चा झाली. त्यांना नक्की स्टोरी कशी दाखवायची आहे याचा मला अंदाजा आला. वर्कशॉपही झालं. फिल्ममध्ये अनेक टप्पे आहेत. इमोशन आणि रिलेशनशिपला यामध्ये खूपच कॉम्प्लेक्स पद्धतीने दाखवण्यात आलंय.

बोल्ड सीन्स देताना विचित्र वाटलं का?

कुमुद मिश्रा म्हणाले,'विचित्र तर वाटतंच. मी काही २१ वर्षांचा नाही की अशा प्रकारचे सीन्स देईन. मी सीन्स करताना पूर्णपणे परफॉर्मरच्या भूमिकेत जातो. केवळ बोल्ड सीन्स करताना नाही तर नॉर्मल एखादा सीन करताना सुद्धा विचित्र वाटू शकतं. तसंच यामध्ये समोर काजोल असल्याने मी खूप नर्व्हस झालो होतो. ती खूप सहजतेने अभिनय करते. आमच्यासारख्या कलाकारांना त्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण मला उलट काजोलमुळे खूप सहज अभिनय करता आला. तिनेच मला खूप कंफर्टेंबल केलं.

काजोलसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

या प्रश्नावर कुमुद मिश्रा म्हणाले,'तुम्ही भूमिका करताना एक परफॉर्मर असता. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात जर विश्वास असेल तर तुम्हालाही अभिनय करणं सोप्पं जातं. काजोलच्या डोळ्यात मला तो दिसला. तिने माझ्यासाठी काम सोप्पं केलं. सेटवर आल्यावर पहिली ओळख कशी होते आणि पहिलाच सीन तुम्ही कसा देता यावर पुढचं अवलंबून असतं. मी काजोलला भेटलो तेव्हा तिने मला खूप कंफर्टेबल केलं. तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच समजलं की आता काम करणं सोप्पं होणार आहे. 

टॅग्स :काजोललस्ट स्टोरीज