Join us

"मैत्रीचं, प्रेमाचं धुकं भरून टाकतं आभाळ का मग....", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 10:13 AM

Kushal Badrike : कुशलने केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यात त्याने नात्यावर भाष्य केलंय.

चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike). त्याने विनोदाच्या अचूक टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. कुशलचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतीच कुशलने केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यात त्याने नात्यावर भाष्य केलंय.

कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर निसर्गरम्य ठिकाणावरचे त्याचे फोटो शेअर करत लिहिले की, परवा उंच कड्यावरून धुकं बघत होतो काही वेळ. धो…धो.. पाऊस पडला, धुकं दाट झालं आणि मग हळू हळू विरळ होत दरीत कोसळून गेलं. आता सगळं स्पष्ट दिसू लागलंय. काही नात्यांच्या बाबतीतही मी असाच एका टोकावर उभा आहे. बघू... मैत्रीचं, प्रेमाचं धुकं भरून टाकतं आभाळ का मग कोसळून जातंय दरीत…..!

कुशल बद्रिकेच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ते कमेंट्स करत या पोस्टवर आपलं मत व्यक्त करत आहेत. एका युजरने म्हटलं की, कसं सुचतं रे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, धो धो पाऊसात आणि नंतर पडणाऱ्या धुक्यात सगळं सुंदर वाटतं पण ते क्षणिक सुख देणार असतं मग जो सूर्याचा किरण येतो आणि सगळं स्पष्ट दिसू लागत ती म्हणजे मैत्री सर्व खोट्या धुक्याना बाजूला करून स्पष्टता आयुष्यात आणते तिच खरी मैत्री. आणखी एकाने लिहिले की, खूप छान विचार.

वर्कफ्रंटकुशल बद्रिकेला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात ओळख मिळाली. हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर तो हिंदी टेलिव्हिजनकडे वळला. सध्या तो सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात दिसत आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या