Join us

"एक हिंदू म्हणून मलाही...", आदिपुरूषचा 'कुंभकर्ण'ही 'त्या' डायलॉगवरून दिग्दर्शकावर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 5:26 PM

Lavi Pajni Reaction On Adipurush : आदिपुरूष चित्रपटावरून देशातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले.

Adipurush : आदिपुरूष चित्रपटावरून देशातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉनचा आदिपुरुष प्रदर्शित झाल्यापासूनच खूप चर्चेत आहे. रामायणावर आधारित असलेला हा चित्रपट अनेकांच्या भावना दुखावणारा असून त्याच्यावर बंदी घालावी, अशी विविध संघटनांसह राजकीय पक्षांनी मागणी केली. या चित्रपटातील संवादापासून ते व्यक्तिरेखेपर्यंत कोणालाही प्रेक्षकांंना प्रभावित करता आले नाही. या चित्रपटात कुंभकर्णाची भूमिका साकारणारा अभिनेता लवी पजनीने देखील दिग्दर्शक ओम राऊत यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ओम राऊत यांच्यामुळेच हा चित्रपट वादाला तोंड देत असल्याचे त्याने निशाणा साधत म्हटले आहे. "दिग्दर्शक तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्हाला करावे लागते. कारण तुम्ही एका कराराखाली असता. त्यावेळी जो चित्रपट बनतो तो विविध भागांमध्ये बनवला जातो आणि पडद्यावर काय जाणार हे कोणालाच स्पष्ट कळत नाही. पण मी एक हिंदू असल्याने चित्रपटातील संवादांमुळे दुखावलो गेलो आहे", असे लवी पजनीने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

डायलॉगवरून वादआदिपुरुष या चित्रपटातील हनुमानजींच्या संवादावरून अनेकांनी आक्षेप घेतला. लक्षणीय बाब म्हणजे वादानंतर हे संवाद देखील बदलण्यात आले आहेत. पण, अद्याप या चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. 

अनेकांनी व्यक्त केला संतापलवी पजनीच्या आधी मुकेश खन्ना, रामानंद सागर यांचा रामायण फेम अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांनीही संताप व्यक्त केला होता. लवीने आदिपुरुषमध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारली आहे. या व्यक्तिरेखेसाठी त्याने खास डाएट फॉलो करत वजन वाढवले. या भूमिकेसाठी त्याने सहा ते सात किलो वजन वाढवले ​​होते.  

टॅग्स :आदिपुरूषबॉलिवूडहिंदू