नवी दिल्ली- वस्तू आणि सेवाकर(जीएसटी) विभागानं तेलुगू चित्रपट सुपरस्टार महेश बाबू यांची दोन बँक खाती सील केली आहेत. महेश बाबू यांनी 2007-08दरम्यान ब्रँड अँबेसेडर, चित्रपटातील अभियन आणि उत्पादनांच्या प्रचाराच्या केलेल्या जाहिरातीतल्या मिळालेल्या पैशांवर योग्य सर्व्हिस टॅक्स दिला नाही. त्यानंतर जीएसटी विभागानं गुरुवारी महेश बाबू यांच्या एक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेतल्या खाती गोठवली आहेत.73.5 लाख रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यात कर, व्याज आणि दंडाचा समावेश आहे. जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की, महेश बाबू यांना यासंदर्भात अपीलीय प्राधिकरणानं दिलासा दिलेला नाही. आम्ही बँक खाती गोठवून वसुलीला सुरुवात केली आहे.आम्हाला आज एक्सिस बँकेतून 42 लाख रुपये मिळाले, आयसीआयसीआय बँक आज(28 डिसेंबर) वसुली करणार आहे. महेश बाबू हे दक्षिणेतले सुपरस्टार आहेत. टॉलिवुडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्यांची नोंद आहे. त्यांची एकूण संपत्ती 140 कोटींहूनही अधिक आहे. इतकेच नव्हे, तर ते एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी रुपये घेतात.
महेश बाबू यांची बँक खाती सील, GST विभागाची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 1:38 PM