अभिनेता मनित जौराने केला 'हा' खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 01:42 PM2018-07-07T13:42:47+5:302018-07-08T08:00:00+5:30
‘जजबात... संगीन से नमकीन तक’ या चॅट शोमध्ये आतापर्यंत रोहित व रोनित रॉय, अदा खान, दिव्यांका त्रिपाठी व विवेक दाहिया, धीरज धूपर, राखी सावंत, बरून सोब्ती, करण पटेल यांनी हजेरी लावली आहे.
‘झी टीव्ही’वर शनिवार-रविवारी प्रसारित होणाऱ्या ‘जजबात... संगीन से नमकीन तक’ या चॅट शोमध्ये आतापर्यंत प्रेक्षकांना रोहित व रोनित रॉय, अदा खान, दिव्यांका त्रिपाठी व विवेक दाहिया, धीरज धूपर, राखी सावंत, बरून सोब्ती, करण पटेल, आश्का गोराडिया, गौरव चोप्रा व इतर अनेक लोकप्रिय टीव्ही कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अज्ञात माहिती मिळाली आहे. वीकेन्डच्या ह्या भागामध्ये झी टीव्हीवरील लाडके अभिनेता मनित जौरा, करण वोहरा आणि अक्षय म्हात्रे ह्या मनोरंजक आणि मस्तीने भरलेल्या संध्येमध्ये एकत्र दिसून येतील. हे देखणे त्रिकूट आपल्या आयुष्यातील संगीन आणि नमकीन क्षणांबद्दल बातचीत करतील सूत्रसंचालक राजीव खंडेलवालसोबत.
ह्या शोमध्ये ह्या तिघांनीही इंडस्ट्रीमधील आपल्या प्रवासातील छोट्यामोठ्या रोचक गोष्टींबद्दल सांगितले आणि अन्य कोणालाही माहिती नसलेल्या ह्या गोष्टींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यातच पुढे कास्टिंग काऊचचा विषय निघाला आणि राजीवने ह्या तिघांनाही त्यांचे मत विचारले. अभिनेता मनित जौराने याबद्दल आपले प्रांजळ मत सांगितले आणि कास्टिंग काऊचचा त्याला आलेला अनुभव कथन केला.
मनित जौरा म्हणाला, “मी एकदा माझ्या व्हॅनिटीमध्ये होतो, जेव्हा एक अज्ञात पुरूष आत आला आणि त्याने माझ्याशी बातचीत करायला सुरूवात केली. मग तो माझ्या जवळ येऊ लागला आणि त्याने त्याचा हात माझ्या मानेवरून फिरवला. मला कसंतरीच वाटू लागलं. तो माझ्यासाठी एक प्रचंड मोठा सांस्कृतिक धक्का होता कारण मला त्याआधी कधीच असा अनुभव आला नव्हता. मी लगेचच माझ्या मित्राला फोन केला आणि त्याला घडलेली गोष्ट सांगितली.”
मनितने न चिडता ह्या परिस्थितीला हाताळलं. अनेक भावनिक आणि मस्तीपूर्ण संवादांसोबत मनित, अक्षय आणि करण यांनी टन टना टन वर नाचही केला आणि हास्याचे फवारे निर्माण करणाऱ्या खेळांमध्येही भाग घेतला. एवढेच नाही तर प्रेक्षकांना मनित आणि करण हे ह्या शोमध्ये शर्टलेसही दिसतील. ह्या भागातील मनोरंजन अतिशय सर्वोच्च स्तरावर होते कारण ह्या त्रिकूटाची केमिस्ट्री मस्त जुळून आली आणि त्यांच्याशी थेट संवाद साधताना त्यांच्या आयुष्यातील रोचक क्षणांबद्दलही माहिती मिळाली.