टीव्हीवरील ऐतिहासिक मालिका 'महाभारत'चे अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी 12 वर्षांनंतर पत्नी स्मितापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. स्मिता या पेशाने आयएएस अधिकारी आहेत. सप्टेंबर 2019 मध्येच या जोडप्याचे नाते तुटले होते. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत त्या इंदूरमध्ये आई स्मितासोबत राहतात. नितीश भारद्वाज यांनी एका मुलाखतीत पत्नी स्मितापासून विभक्त झाल्यासंदर्भात खुलासा केला.
नीतीश भारद्वाज यांचे पत्नीसोबतचे 12 वर्षांचे नाते तुटले -बॉम्बे टाईम्सशी बोलताना नितीश भारद्वाज म्हणाले, "होय, मी सप्टेंबर 2019 मध्ये फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आम्ही का विभक्त झालो, याच्या खोलात जाण्याची माझी इच्छा नाही. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. मी एवढेच सांगू शकतो की घटस्फोट मृत्यूपेक्षा अधिक वेदनादायक असतो.
लग्नाच्या नात्यासंदर्भात बोलताना भारद्वाज म्हणाले, 'लग्नसंस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे. पण त्याबाबतीत मी कमनशिबी ठरलो. लग्न अयशस्वी ठरण्याची अनेक कारणं असू शकतात, अनेक वेळा आपण आपल्या साथिदारच्या अॅटिट्यूडसोबत कॉम्प्रमाइज करू शकत नसता, तर कधी कम्पॅशनची कमतरता असते. कधी कधी ईगो अडवा येतो. तर कधी आपले विचार मॅच होत नाहीत. पण नाते तुटल्यानंतर सर्वाधिक त्रास मुलांना होतो. यामुळे, मुलांवर वाईट परिणाम होतो आणि या केवळ पालकच जबाबदार असतात.'
मुलींसोबत बोलणे होते? या प्रश्नावर नीतीश भारद्वाज म्हणाले, मला यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करायचे नाही. या नात्यासंदर्भात जेव्हा स्मिता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा त्यांनी कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही.