Ravi Kishan at Mahakumbh: अभिनेते आणि भाजपाचे खासदार रवी किशन मंगळवारी प्रयागराजमध्ये महाकुंभात पोहोचले. तिथे त्यांनी त्रिवेणी संगमावर शाहीस्नान केले. रवी किशन यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यात ते डुबकी मारताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्टसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा पवित्र महाकुंभमेळा आहे.
रवी किशन कुटुंबासह महाकुंभात
एका व्हिडिओद्वारे, त्यांनी महाकुंभ दरम्यान मैदानापासून नदीपर्यंत पोहोचण्यापर्यंतच्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आध्यात्मिक प्रवासाची झलक दाखवली. व्हिडिओसोबत रवी किशन यांनी गायक कैलाश खेर यांचे 'महाकुंभ है' हे भक्तिगीत देखील जोडले. सामान्य लोकांसोबतच त्यांनी मोठ्या उत्साहाने महाकुंभात सहभागी होत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला.
प्रिती झिंटापासून ते कतरिना कैफपर्यंत साऱ्यांची हजेरी
सोमवारी, प्रीती झिंटा देखील महाकुंभात आली होती. तिने वर्णन करताना 'सत्यम शिवम सुंदरम' असे म्हटले होते. प्रीती झिंटाच्या आधी, अक्षय कुमार देखील महाकुंभात पोहोचला. त्यानेही पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अद्भुत व्यवस्थेबद्दल आभार मानले. कतरिना कैफही तिच्या सासू वीणा कौशल यांच्यासोबत महाकुंभात आली. याशिवाय सोनाली बेंद्रे, रवीना टंडन, राशा थडानी, ईशा कोप्पीकर, एकता कपूर आणि शिवांगी जोशी, भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव 'निरहुआ' आणि अभिनेत्री आम्रपाली यांच्यासह इतर कलाकारही महाकुंभात हजेरी लावून गेले आहेत.