बॉलिवूड अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt)ने कधी रोमँटिक हिरो तर कधी डॅशिंग हिरो वा खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ चित्रपटाने संजय दत्तचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. नायक नहीं खलनायक हूं मैं हे या सिनेमातील गाणं विशेष लोकप्रिय झालं. संजय दत्त, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ हे त्रिकूट असलेला चित्रपट एवढा गाजेल असे कोणालाच वाटले नव्हते. संपूर्ण श्रेय हे कथानक, आणि या तिघांचा अभिनय यांना जाते. या सिनेमा संबंधीत एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
खलनायक हा दिग्दर्शक सुभाष घई यांच्या करिअरमधील फार महत्वाचा सिनेमा. या सिनेमांची स्क्रीप्ट तयार असल्याचे सुभाच घई यांनी सांगितले होते. इतकेच नाही तर संजय दत्त हा खलनायकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. यातील बल्लूची भूमिका संजयने अफलातून साकारली आहे. आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. पण अनेकांना या भूमिकेची एक मजेदार बाब माहीत नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही की, या भूमिकेसाठी सुभाष घई यांची पहिली पसंत संजय दत्त नव्हताच. बल्लूच्या भूमिकेसाठी तीन अभिनेत्याने नकार दिल्यानंतर ही भूमिका संजय दत्तकडे आली.
सुभाष घई यांची इच्छा होती ही भूमिका आमिर खानने साकारावी पण तो नेगेटीव्ह भूमिका करण्याचा मूडमध्ये नव्हता. त्याने या भूमिकेसाठी नकार दिला. आमिरने नकार दिल्यानंतर या भूमिकेसाठी नाना पाटेकर यांना विचारण्यात आलं. नाना पाटेकर यांचं नाव फायनल करुन सुभाष घईनी यावर काम देखील सुरु केलं होतं, असा खुलासा त्यांनी एक मुलाखतीत केला होता. चित्रपटाची कथा जसजशी फायनल होत गेली. तेव्हा लक्षात आलं की नाना पाटेकर हे याभूमिकेत फिट बसत नसल्याचं निर्मात्यांच्या लक्षात आलं. यानंतर जाऊन संजय दत्तला ही भूमिका ऑफर करण्यात आली