अभिनेते संजीव कुमार अशा अभिनेत्यांपैकी होते ज्यांना आपल्या अदाकारीसाठी ओळखलं जात होतं. ९ जुलै १९३८ मध्ये गुजरातच्या सूरतमध्ये त्यांचा जन्म झाला होता. प्रोफेशनल लाइफमध्ये त्यांना फार नाव आणि पैसा मिळाला. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. तेच त्यांच्या पर्सनल लाइफबाबत सांगायचं तर ती फारच साधी होती.
हेमा मालिनींवर आला होता जीव
लाखो फॅन्स असूनही संजीव कुमार यांच्या लाइफमध्ये एकटेपणा होता. त्यांची पर्सनल लाइफ फारच वेदनादायी होती. त्यांची लव्हस्टोरी पूर्ण होऊ शकली नाही. इतकंच नाही तर त्यांनी कधी लग्नही केलं नाही. संजीव कुमार हे बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीवर प्रेम करत होते. त्यांनी हेमाला प्रपोजही केलं होतं. पण हेमा मालिनीने त्यांच्या प्रेमाला नकार दिला. संजीन कुमारने एकतरफी प्रेमात सगळं आयुष्य एकट्यात काढलं. त्यांनी कधीच लग्न केलं नाही.
संजीव कुमार यांच्या कामाबाबत सांगायचं तर ते आजही लोकप्रिय असलेल्या अनेक गाजलेल्या सिनेमांचा भाग होते. त्यांनी 'हम हिंदुस्तानी' सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमात त्यांचा छोटासा रोल होता. 'निशान' सिनेमात ते मुख्य भूमिकेत.
त्यानंतर ते 'खिलौना', 'ये है जिंदगी', 'नया दिन नई रात', 'इतनी सी बात', 'उलझन', 'पती, पत्नी और वो', 'अंगूर', 'आंधी', 'सीता और गीता', 'आपकी कसम' सारख्या एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमात काम केलं. तसेच संजीन कुमार यांनी 'शोले' सिनेमात साकारलेला ठाकुर आजही लोकप्रिय आहे. त्यांची ही भूमिका अमर झाली आहे.
संजीव कुमार यांना हृदयाची समस्या होती. त्यामुळे वयाच्या ४७व्या वर्षी ते या जगाला सोडून गेले. ६ नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. त्यांचे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात.