मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठीच नाही तर तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषिक सिनेमात काम केले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सयाजी शिंदे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच ते सामाजिक कार्यातही सहभाग घेताना दिसतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. त्यांच्या पत्नी आणि मुले लाइमलाईटपासून दूर आहेत. त्यांची पत्नी खूप सुंदर आहेत.
सयाजी शिंदे यांचा जन्म १३ जानेवारी १९५९ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याजवळील वेळे-कामती नावाच्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला. सयाजी यांनी मराठी भाषेत कला विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचा नाईट वॉचमन म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या करिअरची सुरूवात केली. त्यांना रुपये १६५ दरमहा पगार दिला होता. पहारेकरी म्हणून सेवा बजावताना नाट्यगृहाची आवड निर्माण झाली आणि अभिनयाची आवड त्यांना थिएटर आणि चित्रपटांकडे ओढू लागली.
झुल्वा, वन रूम किचन आणि आमच्या या घरात ही नाटके त्यांची गाजली. त्यानंतर त्यांनी बर्याच मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात कृषिमंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. सयाजी शिंदे यांनी बऱ्याच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.