Join us

Sharad Ponkshe : "हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं"; अभिनेते शरद पोंक्षेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 12:27 PM

Actor Sharad Ponkshe And CM Eknath Shinde : अभिनेते शरद पोंक्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. "हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं" आहे असं म्हटलं आहे. 

मुंबई - एकनाथ शिंदे य़ांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला देखील भेट दिली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. याचा एक फोटो देखील समोर आला. हा फोटो पाहून अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) य़ांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी (CM Eknath Shinde) खास पोस्ट शेअर केली आहे. "हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं" आहे असं म्हटलं आहे. 

शरद पोंक्षे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर इतर त्यांचे काही सहकारी देखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करत असताना शरद पोंक्षे यांनी "मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे सावरकरांना मानवंदना देण्यासाठी गेले. हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं आहे" असं म्हटलं आहे. शरद पोंक्षे यांच्या एका पोस्टची य़ाआधी तुफान चर्चा रंगली होती. पोंक्षे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते. 

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील ते आपली मतं सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी "मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले" असं म्हणत एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट केली होती. पोंक्षे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. यामध्ये "कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे मा. शिंदेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने ऊभे राहीले" असे कॅप्शन लिहित शरद पोंक्षे यांनी एक फोटो देखील शेअर केला होता. 

ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये "हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं... सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले" असं लिहिलं होतं. अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'दुसरं वादळ' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. यानिमित्ताने त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पोंक्षे यांची नवीन इन्स्टा पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.  

टॅग्स :शरद पोंक्षेएकनाथ शिंदेराजकारण