Sheezan Khan Family Statement: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच शीजानच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. शीजान याला सध्या याप्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. शीजान आणि तुनिषा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि १५ दिवसांपूर्वीच ब्रेकअप झालं होतं. याच तणावाखाली येऊन तुनिषानं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच तुनिषानं सेटवर शीजान याच्याच मेकअप रुममध्ये आत्महत्या केली आहे. त्यामुळे शीजानच्या अडचणी वाढल्या आहेत. यातच शीजानच्या कुटुंबीयांनी मात्र याप्रकरणावर अधिक बोलणं टाळलं आहे. योग्य वेळ आली सविस्तर बोलू, असं शीजानच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
शीजानची 'ती' सीक्रेट गर्लफ्रेंड कोण? अन् तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात तिची भूमिका काय?
तुनिषाच्या आईनं केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांनी तुनिषा आत्महत्याप्रकरणी शीजान याला अटक केली आहे. शीजान यांचे कुटुंबीय आणि बहिणी शफाक व फलक नाज यांनी पहिल्यांदाच याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. "या दुःखाच्या वेळी कृपया आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घ्या. मीडियाचे लोक आम्हाला सतत फोन करत आहेत आणि आमच्या इमारतीखाली उभे आहेत हे पाहून वाईट वाटतं", असं शीजानच्या बहिणींनी म्हटलं आहे.
आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषा शर्माने आईला सांगितली होती तिची अवस्था, म्हणाली मला शिजान.....
"आमचा भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि शीजान संपूर्ण प्रक्रियेत मुंबई पोलिसांना सहकार्य करत आहे. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आम्ही याबद्दल बोलू, परंतु सध्या कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. तो आमचा अधिकार आहे", असंही शीजानची बहिण म्हणाली.
तुनिषाच्या आईनं केले गंभीर आरोप“तुनिषाच्यासोबत शीजाननं नातं निर्माण केलं. लग्नाचं आश्वासन दिलं पण त्यानंतर त्यानं तुनिषासोबत ब्रेकअप केलं. तो आधी दुसऱ्या मुलीसोबत होता, तरीही त्याने तुनिषाला फसवलं. तीन ते चार महिने तिला अंधारात ठेवून तिचा गैरफायदा घेतला. मला एवढंच म्हणायचं आहे की त्याला शिक्षा झाली पाहिजे. शीजानला सोडू नका. मी माझ्या मुलीला गमावलं आहे", असं तुनिषाची आई म्हणाली.