'क्यों आज-कल नींद कम, ख्वाब ज्यादा है...' हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. हे गाणे कानावर पडले की त्याचा संपूर्ण सीन डोळ्यांसमोर तरळू लागते. २००६ मध्ये रिलीज झालेल्या मोहित सूरीच्या दिग्दर्शनातील वो लम्हेंमध्ये कंगना रणौत होती. यासोबतच शायनी आहुजा(Shiney Ahuja)ही दिसला होता. 'हजारों ख्वाहिशें ऐसी' मधून पदार्पण करणारा हा अभिनेता बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. एका कथित चुकीमुळे, तो आज कुठे आहे आणि काय करत आहे याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
शायनी आहुजाने २००५ मध्ये 'हजारों ख्वाहिशें ऐसी'मधून पदार्पण केले. 'गँगस्टर', 'वो लम्हे', 'लाइफ इन ए.. मेट्रो', 'भूल भुलैया' अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू चालवणाऱ्या शायनीला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअरही मिळाला होता. २००९ मध्ये घरातील मोलकरणीने बलात्कारासारखा गंभीर आरोप लावल्यानंतर त्याचे खासगी आयुष्य आणि फिल्मी करिअर उद्ध्वस्त झाले. सर्वप्रथम त्याच्या चाहत्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता, पण जेव्हा न्यायालयात ही गोष्ट सिद्ध होऊन त्याला जेव्हा ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हा मात्र त्याची खूप बदनामी झाली. यानंतर मात्र शायनीचे चाहते त्याच्यावर खूप नाराज झाले होते.
अभिनेत्याला ७ वर्षांचा झाला तुरुंगवासमोलकरणीने खोटी साक्ष दिल्यामुळेसुद्धा हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. २०११ मध्ये शायनी आहुजाला जामिनावर सोडण्यात आले. पण नंतर तपासादरम्यान तो दोषी असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ३००० रुपये दंड ठोठावण्यात आला. सध्या तो या सिनेइंडस्ट्रीपासून अज्ञातवासात आयुष्य व्यतित करत आहे.
शायनी आहुजा शेवटचा झळकला 'वेलकम बॅक'मध्येशायनी आहुजा शेवटचा पडद्यावर 'वेलकम बॅक'मध्ये दिसला होता. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. शायनी आहुजाने १९९७ मध्ये अनुपम पांडेसोबत लग्न केले. त्यांना अर्शिया नावाची मुलगी आहे. शायनी आता लाइमलाइटपासून दूर राहते. जीवन जगण्यासाठी बिझनेस करत आहे. त्याच्या बलात्कार प्रकरणापासून प्रेरित होऊन 'सेक्शन ३७५' हा लीगल ड्रामा चित्रपटही प्रदर्शित झाला. हा चित्रपट शायनी आहुजाचा मित्र मनीष गुप्ताने लिहिला होता. यासाठी अभिनेत्याला अटक झाली. त्यावेळी मनीषने या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांशी चर्चा केली होती.