अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय...जानेवारी 2021 मध्ये पुण्याच्या ढेपेवाडा मध्ये या दोगांनी लग्नगाठ बांधली...लग्नानंतर हे सेलेब्रिटी कपल त्यांच्या दररोजच्या एक्टिव्हिटी तसेच सोबत घालवलेले खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच असा एक व्हीडिओ सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यामध्ये बेडवर ती चादर ओढून झोपलेली दिसतेय...आणि तिला सिद्धार्थ उठायला सांगतोय. पण ती उठतच नाहीये...मग काय सिद्धार्थ पण तिला घरातील कामांची गिनती सांगायला सुरुवात करतो .केर काढायचाय, फरशी पुसायचीये,कपडे धुवायला टाकायचेत,भांडी घासायचेत.
ज्यावेळी आयस्क्रीम खायची गोष्ट निघते तेव्हा लगेचच ती चादर मधून बाहेर येते. मजेशीर गोष्ट म्हणजे ती मिताली नाही तर ती डोरा आहे. डोरा सिद्धार्थची डॉगी आहे...डोराला आयस्क्रीम खूप आवडतं वाटतं...आणि म्हणूनच आयक्रीमचं नाव काढताच डोरा उठून बसताना दिसतेय... सिद्धार्थ आणि मितालीचा डोरावर खूप जीव आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी डोराचा वाढदिवसही साजरा केला होता. डोराचे असे अनेक मजेशीर व्हिडीओ सिद्धार्थ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
‘हमने जिना सीख लिया’ या हिंदी सिनेमाद्वारे 2007 मध्ये सिद्धार्थ प्रेक्षकांसमोर आला. 2010मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिलं पाऊल टाकलं. ‘क्लासमेट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,आॅनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार, झिम्मा या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तर मितालीने ‘उर्फी’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केले. शेवटची ती लाडाची मी लेक गं या मालिकेत झळकली होती.