Join us

Video: सिद्धार्थ जाधवचं 'शिवडी English' ऐकलं का? लंडनमध्ये लोकांशी बोलताना अभिनेत्याची झाली फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 3:25 PM

Siddharth Jadhav: २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दे धक्का' या चित्रपटाचा हा सिक्वल असून या नव्या भागात जाधव कुटुंब लंडनला पोहोचतं.

मराठी कलाविश्वातील दिलखुलास आणि उत्तम अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). आपल्या अभिनयाच्या जोरावर सिद्धार्थने मराठीसह बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे. सध्या सिद्धार्थ त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत येत असून एका पोठापाठ एक असे त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहे. यात नुकताच त्याचा ‘दे धक्का २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं लंडनमध्ये चित्रीकरण पार पडलं असून येथील एक मजेदार व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दे धक्का' या चित्रपटाचा हा सिक्वल असून या नव्या भागात जाधव कुटुंब लंडनला पोहोचतं. येथे गेल्यावर ते काय धम्माल करतात हे दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे  पडद्यावर धम्माल करणाऱ्या या कलाकारांनी पडद्यामागेही तितकीच मज्जा केली. याची झलक सिद्धार्थने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दाखवली आहे. यात लंडनला गेल्यानंतर तेथील नागरिकांशी इंग्लिशमध्ये बोलताना कशी फजिती झाली हे त्याने सांगितलं आहे.

मुंबईतील शिवडी येथे एका सामान्य कुटुंबात सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. त्यामुळे आजही त्याचे पाय जमिनीवर असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे लंडनला गेल्यानंतरही त्याला शिवडीची आठवण आल्यावाचून राहिलं नाही.

सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लंडनमध्ये एक व्यक्ती त्याच्याशी संवाद साधायला आला. मात्र, सिद्धार्थची ऐनवेळी फजिती झाली.  “मी इंग्रजी भाषेमध्ये बोललेलं तुम्हाला समजंतय का? पण मी इंग्रजी भाषेमध्ये बोलत असताना हे बघा माझ्याबरोबरचे इतर लोक कशी मजा घेत आहेत, असं सिद्धार्थ या व्हिडीओमध्ये म्हणतो. तसंच "शिवडी English.. शिवडीची केवढी English in लंडन...", असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं.

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसेलिब्रिटीदे धक्का 2सिनेमा