काल बिग बॉस मराठीच्या घरात मोठा राडा झाला. जान्हवी किल्लेकरने काल बिग बॉसच्या घरात पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेच्या अभिनयावर चांगलीच टीका केली. सुरुवातीला जोकर म्हणत पॅडीने आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग केली, अशा शब्दात जान्हवीने पॅडीवर टीका केली. पॅडीने सर्व ऐकून घेतलं. तो तिला काही बोलला नाही. आज दिवसभरात अनेक मराठी कलाकार पॅडीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करत आहेत. अशातच पॅडीचा खास मित्र आणि अभिनेता सिद्धार्थ जाधवने मोजक्याच शब्दात पोस्ट लिहून जान्हवीला सणसणीत चपराक दिली आहे.
सिद्धार्थची पॅडीसाठी खास पोस्ट
सिद्धार्थने सोशल मीडियावर पॅडीसाठी खास पोस्ट लिहिलीय. सिद्धार्थ लिहितो, "...जोकर "...बर मग... Overacting... बरं मग.. पण या overacting करणाऱ्या जोकर चा "संयम" दिसत नाही का तूला... एकदा का तो सुटला की तुझी bbmarathi मधली "over re acting" वाली jokergiri पण दिसणार नाही... याला म्हणतात "अनुभव" तुझ्यासारखी कितीही (जा) नवी लोकं आली ना.. तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव... जुनं तेच सोनं .... आणि माझा भाऊ प्रेमाणे जग जिंकणारा आहे..." अशाप्रकारे सिद्धार्थने पॅडीला सपोर्ट केला असून जान्हवीला खडे बोल सुनावले आहेत.
बिग बॉसच्या घरात काय घडलं?
काल बिग बॉस मराठीच्या घरात टास्क झाल्यावर जान्हवी रागाच्या भरात मोठ्या आवाजात पॅडी कांबळेला उद्देशून म्हणाली, "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत." पॅडीने हे ऐकलं. त्याने अंकिताजवळ शांतपणे त्याची बाजू मांडली. पण तो जान्हवीला काही बोलली नाही. पॅडीने ज्या शांतपणे प्रकरण हाताळलं, त्याचं कौतुक होत आहे.