गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉडडाऊननंतर देशात वेगाने बेरोजगारी आणि गरीबी वाढत आहे. अशात गरजू लोकांची मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सूद सुपरहिरो म्हणून समोर आला. अभिनेता सोनू सूदने अनेक प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवले तर अनेकांना आर्थिक मदत केली. अशातच ट्विटरवर माउंटेनमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या दशरथ मांझीच्या परिवाराची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याचे सोनूला समजले आणि तो त्यांच्या मदतीसाठीही धावून आला.
सोनू सूदला ट्विटरवर टॅक करून एका बातमी ट्विट करण्यात आली होती. सोनूकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. ज्यात लिहिले होते की, माउंटेनमॅन नावाने प्रसिद्ध दशरथ मांझीचा परिवारही हलाखीचं जीवन जगत आहे. हे वाचून सोनूने लगेच त्यांना मदतीसाठी हात पुढे केला.
काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती की, दशरथ मांझी यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती फारच नाजूक आहे. त्यांना खाण्यासाठी अन्नही नाही. ही बातमी जेव्हा सोनू सूदला टॅग केली तेव्हा त्याने याला रिप्लाय दिला की, ''आज से तंगी खत्म, आज ही हो जाएगा भाई.'
याच दशरथ मांझी यांच्या जीवनावर 'मांझी द माउंटेनमॅन' हा सिनेमा आला होता. ज्यात नवाझुद्दीन सिद्दीकीने दशरथ मांझीची भूमिका साकारली होती.
दरम्यान, सोनूने काही दिवसांपूर्वीच बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी एक अॅप लॉन्च केले होते. तसेच अनेक गरीब विद्यार्थ्यांनाही तो मदत करत आहे. सोनूच्या या अविरत मदतीच्या कामासाठी त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
हे पण वाचा :
असं काय झालं होतं की, अमरीश पुरी आणि आमीरने कधीच एका सिनेमात केलं नाही काम?
'दिल बेचारा' प्रदर्शित होताच हॉटस्टार झाले होते क्रॅश, रसिकांचा झाला होता हिरमोड