Join us

व्वा रे पठ्ठ्या! सोनू सूदने शब्द दिला तो खरा केला, काही तासांत बळीराजाच्या शेतात ट्रॅक्टर पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:13 AM

मानले रे भावा...

ठळक मुद्देकोरोना काळात गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून आलेला अभिनेता सोनू सूद ख-या अर्थाने सुपरहिरो ठरला आहे. 

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद शब्दाचा पक्का आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आंध्र प्रदेशातील एका गरीब शेतक-याला ट्रॅक्टर घेऊन देण्याचा शब्द त्याने दिला होता. त्याने तो शब्द पाळला आणि अगदी काही तासांत या बळीराजाच्या शेतात नवा कोरा ट्रॅक्टर पोहोचला.कृष्णमुर्थी नावाच्या एका पत्रकाराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथील टमाटा उत्पादक शेतक-याने आपल्या शेतात नांगरणी करताना, बैलांच्याजागी आपल्या दोन मुलींना जुंपल्याचा हा व्हिडीओ होता.

बैल विकत घेण्यासाठी या शेतक-याकडे पैसै नसल्याने त्याने कुटुंबाच्या मदतीनेच नांगरणी केली. सोनू सूदने हा व्हिडीओ पाहिला आणि तो हळहळला. त्याने लगेच  या गरीब शेतक-याला बैलजोडी घेऊन देण्याची घोषणा केली. मात्र, काही वेळातच सोनूने आपला निर्णय बदलला आणि या शेतक-याला बैलजोडीऐवजी ट्रॅक्टर घेऊन देण्याचे आश्वास दिले. उद्यापर्यंत या बळीराजाच्या शेतात ट्रॅक्टर पोहोचेल, असेही सोनूने म्हटले. यानंतर खरोखरचं अगदी काही तासांत या बळीराजाच्या शेतात ट्रॅक्टर पोहोचला.सोनू सूद फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, हे त्याने आपल्या या कृतीतून दाखवून दिले.

  कोरोना काळात गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून आलेला अभिनेता सोनू सूद ख-या अर्थाने सुपरहिरो ठरला आहे.  लॉकडाऊनच्या काहात त्याने हजारो स्थलांतरित प्रवाशांना   त्यांच्या घरी सुरखित पोहोचवले.अनेकांना त्याने आर्थिक मदत केली. अलीकडे माउंटेनमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या दशरथ मांझीच्या परिवाराची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याचे सोनूला समजले आणि तो त्यांच्या मदतीसाठी  धावून आला. दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध आजींना त्याने मुलींना स्व-संरक्षणाचे ट्रेनिंग देण्याची आॅफर दिली होती. 

टॅग्स :सोनू सूद