Join us

अभिनेता सुमित व्यासच्या घरात नव्या सदस्याचे आगमन, पत्नी एकता कौलने दिला मुलाला जन्म!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 13:10 IST

2018मध्ये सुमित आणि एकता लग्नाच्या बेडीत अडकले.

सुप्रसिद्ध अभिनेता सुमित व्यास आणि त्याची पत्नी एकता कौल आई-वडील झाले आहेत. एकताने मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याने ही खुशखबर चाहत्यांना सांगितली. मुलाच्या जन्मानंतर सुमित आणि एकता खूप खुश आहेत. त्यांनी मुलाचे नामकरण देखील केले. 

सुमितने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ''मुलगा झाला आहे. त्याला वेद या नावाने आवाज देण्यात येईल. आई आणि बाबा खुश आहेत.  मुलावर प्रत्येकक्षणाला प्रेमाचा वर्षाव करतायेत'' गजराज राव, निमरत कौर, मिथिला पालकरसह अनेक सेलिब्रेटींनी दोघांचे अभिनंद केले आहे.

सुमित आणि एकता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. एकता प्रेग्नेंट असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होतीय 2018मध्ये सुमित आणि एकता लग्नाच्या बेडीत अडकले. सुमितचे हे दुसरं लग्न आहे.

'वीरे दी वेडिंग', आरक्षण, पार्च्ड सारख्या सिनेमात सुमितने आपलं अभिनय कौशल्य दाखवले आहे. तर  एकतादेखील टीव्ही अभिनेत्री आहे. एकताने 'रब से सोना इश्क 'बडे अच्छे लगते हैं' 'ये है आशिकी' 'एक रिश्ता ऐसा भी' 'मेरे अंगने में' या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सुमीत आणि एकतामधील खूप चांगली केमिस्ट्री सोशल मीडियावर पाहायला मिळते.

टॅग्स :सुमीत व्यास