रजनिकांत यांना दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेता मानले जाते. त्यांनी ‘दरबार’ चित्रपटासाठी ९० कोटी रुपये मानधन घेतले होते. आता एका अभिनेत्याने 100 कोटी रुपये मानधन घेत तो सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
विजयने ‘थलपथी ६५’ चित्रपटासाठी जर १०० कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जात आहे. विजय लवकरच ‘महर्षि’ चित्रपटातील दिग्दर्शक वामसी पैदिपल्ली यांच्या ‘थलपथी ६५’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्याला या चित्रपटासाठी 100 कोटी इतके मानधन मिळाले असल्याचे वृत्त ‘कोईमोई’ने दिले आहे.
विजयचा काही दिवसांपूर्वी ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. २०२१मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे. विजयची लोकप्रियता पाहून त्याला इतके मानधन मिळाले आहे.