अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं खूप फॅन फॉलोईंग आहे. दोन्हीही कलाकार मराठी मनोरंजन विश्वात चांगलेच सक्रीय आहेत. दोघांचेही रील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. ऐश्वर्या आणि अविनाश हे सोशल मीडियावर त्यांच्या मुलाबद्दल पोस्ट टाकत नाहीत. पण नुकतंच ऐश्वर्या-अविनाश या दोघांनीही त्यांचा मुलगा अमेयबद्दल मोठा खुलासा केलाय. अमेय पुढीस शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झालाय. त्यामुळे अविनाश-ऐश्वर्या दोघांनीही लेकासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.
अविनाश नारकर यांची लेकासाठी भावुक पोस्ट
लेक अमेयसोबतचा बालपणीचा आणि त्याला निरोप देतानाचा फोटो पोस्ट करुन अविनाश नारकर लिहितात, "आज आमचा मन्या... आमचा अमेय निघाला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला.... नवनविन गोष्टी जाणून घेण्याचं आणि शिकण्याचं तुझ्या डोळ्यातलं आणि मनातलं कुतुहल असंच कायम जागं राहूदे मन्या..... कोणीही दुखावलं जाईल असं काही करू नकोस...कायम आनंदी रहा आणि तुझ्या कामातून सगळ्यांना आनंद दे.....!!आमचे सगळ्यांचं भरभरून प्रेम आणि आभाळभर आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेतच बब्बु......!! यशस्वी भव....!!"
ऐश्वर्या नारकर लेकाला निरोप देताना काय म्हणाल्या?
ऐश्वर्या यांनीही एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात त्यांचा लेक अमेय आई-बाबांसोबत ड्राईव्ह करत एअरपोर्टला जाताना दिसतो. पुढे ऐश्वर्या-अविनाश लाडक्या लेकाला मिठी मारत त्याला निरोप देताना दिसतात. ऐश्वर्या हा व्हिडीओ शेअर करुन लिहितात, "Manyaaaaa...... Wish you a very very very Happyyyyyyyyy, Safe & Successful Journey Babbu....!!" अशाप्रकारे अमेय पुढील शिक्षणासाठी अमेरिेकेत गेल्याने ऐश्वर्या-अविनाश भावुक झालेले पाहायला मिळत आहेत.