भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 25वर्षांच्या आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(26 मार्च) गळफास घेत आयुष्य संपवलं. आकांक्षाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण समोर आलेलं नव्हत. आता भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून त्यात मृत्यूचे कारण समोर आले आहे. आकांक्षा दुबेचा मृत्यू रविवारी सकाळी सारनाथ परिसरातील हॉटेल सोमेंद्र रेजीडेंसीच्या खोली क्रमांक १०५ मध्ये झाला होता. आकांक्षाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
आकांक्षाच्या आईने हत्येचा आरोप भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंहवर लावला आहे. आकांक्षा दुबेच्या आईनं आरोप केलाय की, समर सिंह आणि संजय सिंह यांनी आकांक्षा दुबेचे मागील ३ वर्षापासून कोट्यवधीचे काम करून पैसे रोखले होते. २१ तारखेला समर सिंहचा भाऊ संजय सिंहने आकांक्षा दुबेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आकांक्षाने स्वत: मला याबाबत फोन करून माहिती दिल्याचं आईने सांगितले. नातेवाइकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी समर सिंहविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात हत्येची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी समर सिंह यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आकांक्षा दुबेचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे समोर आले आहे. आकांक्षाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा नाहीत. यावरून आकांक्षा दुबेची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आकांक्षा दुबे आणि समर सिंह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि एकाच घरात राहत होते, असे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे.
'आज तक'च्या वृत्तानुसार, पोलिसांना शंका आहे की आकांक्षा दुबे आणि समर सिंह यांचे ब्रेकअप झाले असावे, त्यानंतर अभिनेत्री स्वतःला सांभाळू शकली नसावी आणि डिप्रेशनमध्ये गेली असावी. नैराश्यातून आकांक्षाने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.समर सिंग आता पोलिसांच्या रडारवर आहे. आत्महत्येच्या रात्री समरसोबत आकांक्षा एका पार्टीत सहभागी झाली होती.