चित्रपटांतील बोल्ड सीन्स नवी गोष्ट नाही. पण या अभिनेत्री चित्रपटात न्यूड सीन्स देणे महागात पडले होते. होय, न्यूड सीन्स देणा-या या अभिनेत्रींला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. काही नाराज लोकांनी आमला विरोधात तक्रारही दाखल केली. गतवर्षी ‘अदाई’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात या अभिनेत्रीने न्यूड सीन देऊन खळबळ माजवली होती. यामुळे ती वादाच्या भोव-यात सापडली होती.अर्थात चित्रपट रिलीज झाला आणि हे प्रकरण थंड झाले. पण आता ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे आमला पॉल.
आमलाने नुकतेच बाथटबमधील काही फोटो शेअर केलेत. न्यूड सीन्स दिल्याने वादाच्या भोव-यात सापडलेल्या आमलाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सध्या ती बॉयफ्रेंडसोबत बालीमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहे. दरम्यान तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. फोटोत आमला तिचा बॅक टॅटूही फ्लॉन्ट करताना दिसतेय.
बाथटबमध्ये चिल करतानाचे टॉपलेस फोटोही तिने शेअर केले आहेत. तिच्या या टॉपलेस फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.नुकताच आमलाने तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठीच ती बॉयफ्रेन्डसोबत बालीला गेली आहे.
2014 मध्ये आमला पॉलने दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केले होते. पण आता दोघांचा घटस्फोट झाला आहे. 2009 मध्ये मल्याळम सिनेमा ‘नीलातामरा’मधून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर अनेक तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत ती झळकली.