"इतक्या घाणेरड्या आणि...", ट्रोलिंग करणाऱ्यांवर भडकली अमृता, म्हणाली - यात तुमचे संस्कार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:22 PM2024-04-10T12:22:14+5:302024-04-10T12:22:45+5:30
अमृता खानविलकरने तिला ट्रोल करणाऱ्या लोकांसाठी खास पोस्ट लिहून त्यांना सणसणीत चपराक दिली आहे. काय म्हणाली अमृता बघा (amruta khanvilkar)
अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृता विविध विषयांवर व्यक्त होत असते. नुकतीच अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित तिला ट्रोल करणाऱ्यांवर राग व्यक्त केलाय. अमृता लिहिते, "आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल .... नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार .... नवीन मनोकामना .... नवी स्वप्ने ... देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार ...."
अमृता पुढे लिहिते, "जर तुम्ही हे सगळं केलय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मी हि हेच केलं .... कारण मी हि फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे .... संस्काराने मराठी आहे .... मूळची कोंकणातील .... पण जन्म मुंबई चा आहे .... मी हि कोणाची तरी मुलगी आहे ... बहीण आहे .... मावशी आहे .... ताई आहे .... मैत्रीण आहे .... बायको आहे .... आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्या मुळे मी एक अभिनेत्री आहे."
अमृता शेवटी लिहिते, "तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेग वेगळे interviews देत आहे .... वेग वेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर .... आता ह्या क्षेत्रात असल्या मुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे ... पण ट्रॉलिंग च्या नावा खाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात कि लाज वाटते .... वेषभूशा असो ... हसणं असो .. बोलणं असो ...एका स्त्रीच्या प्रत्येक गोष्टी वर किती …किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये ? जे लोक स्वतःचं खरं नाव किंव्हा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात ? मज्जा वाटते तुम्हाला ? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे .... सोशल मीडिया चा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये .... पण ह्या वर जे तुम्ही लिहिता ... बोलता .... ह्यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात असो मी normally ह्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करतेच .... पण कधी कधी समोरच्या ला हे सांगणं गरजेचं असतं कि गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे."