Join us

खिलाडी अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीने गुपचूप केले होते लग्न, आज संभाळते पतीचा अब्जावधींचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 5:07 PM

११ वर्षांची असताना कैसे कैसे लोग या चित्रपटांत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती

नव्वदच्या दशकात आयशा जुल्का हिने बॉलिवूडवर ‘राज’ केले. ‘जो जीता वही सिकंदर’ आठवला की, पाठोपाठ या चित्रपटामधील अंजली हमखास आठवते. या चित्रपटात आयशाने आमिर खानच्या बालमैत्रिणीची भूमिका साकारली होती. आयशाने त्याकाळात अनेक हिट चित्रपटांत काम केले. दलाल, खिलाडी, मुकद्दर, मासूम, एक राजा रानी, मीत मेरे मन के असे अनेक चित्रपट तिने केलेत. या चित्रपटांनी आयशाला लोकप्रिय अभिनेत्रींच्या रांगेत आणून उभे केले. पण यशाच्या शिखरावर असताना आयशाने अचानक चित्रपटांना अलविदा म्हटले. आज आयशाचा चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही.

आयशाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. चित्रपट पाहणे, डान्स तिला मनापासून आवडायचा. ११ वर्षांची असताना कैसे कैसे लोग या चित्रपटांत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर सुमारे ७ वर्षे ती चित्रपटांपासून दूर राहिली. यापश्चात १९९० मध्ये सलमान खानसोबत कुर्बान हा तिचा पहिला चित्रपट आला. १९९२ मध्ये अक्षय कुमारसोबतच खिलाडी , आमिर खानसोबतचा जो जीता वही सिकंदर या चित्रपटाने आयशाच्या करिअरला गती दिली. २००३ मध्ये आंच या चित्रपटात ती दिसली आणि यानंतर हळूहळू इंडस्ट्रीतून गायब झाली.

११ वषार्ची असताना अभिनयाच्या क्षेत्रात येणा-या आयशाला आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे इंडस्ट्री सोडावी लागली. २००३ मध्येच तिने कंस्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत लग्न केले. आता आयशा स्वत:ही एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे.

पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते. अलीकडे एका मुलाखतीत आयशा याबद्दल बोलली होती. मी सध्या सॅमरॉक या कंपनीच्या कामात बिझी आहे. मी आणि माझ्या पतीने ही कंपनी उघडली असल्याचे तिने सांगितले होते. या सर्व बिझनेसचा व्याप अब्जावधीच्या घरात आहे.

टॅग्स :आयशा जुल्का