Join us

वडिलांनंतर लेकही पॉझिटीव्ह, अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 12:03 AM

६५ वर्षीय माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची तब्येत चांगली आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

ठळक मुद्देसध्या दीपिका बंगळुरु येथे विलगीकरणात उपचार घेत आहे.

नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सर्वसामांन्यांपासून नेता, सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. सद्यस्थितीत देशव्यापी लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाल्याची वृत्त होते. त्यानंतर, आता दीपिका पादुकोणचीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दीपिकाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण आणि बहिण अनिशा पादुकोण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर, आता अभिनेत्री दीपिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, दीपिकाच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली आहे. सध्या दीपिका बंगळुरु येथे सेल्फ क्वारंटाईन असून उपचार घेत आहे. 

 मीडिया रिपोर्ट्सनुसार, ६५ वर्षीय माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची तब्येत चांगली आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. असे सांगितले जात आहे की त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्याची शक्यता आहे. त्यातच, आता दीपिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

अनेक सेलिब्रिटींना कोरोना

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत बऱ्याच सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील काहींनी कोरोनावर मातदेखील केली आहे. या सेलिब्रेटींमध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कतरिना कैफ, आलिया भट, रणबीर कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि सोनू सूद यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणकोरोना वायरस बातम्याबेंगळूर