70-80 चा असा काळ होता जेव्हा हेमा मालिनीपासून रेखा, जयाप्रदा ते पूनम ढिल्लो या अभिनेत्रींचं बॉलिवूडवर वर्चस्व होतं. या अभिनेत्रींच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे असंख्य चाहते होते. यामध्येच एका अशा अभिनेत्रीने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली जिच्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा आपोआप तिच्याकडे वळल्या. ही अभिनेत्री होती दिप्ती नवल (Deepti Naval). 'चश्मेबद्दूर', 'किसी से ना कहना', 'अनकही' आणि 'फिरकी' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा त्यांनी दिले. १९७८ च्या दशकात दिप्ती नवल यांनी इंडस्ट्रीत त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली. दिप्ती यांचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहिलं तितकीच त्यांचं खासगी आयुष्य सुद्धा चर्चेचा विषय़ ठरलं.
लग्नानंतर दिप्ती यांचा अवघ्या काही वर्षात संसार मोडला. इतकंच नाहीत त्यांच्या प्रियकराचाही मृत्यू झाला. त्यामुळे वयाच्या ७२ व्या वर्षी ही अभिनेत्री आज एकाकी जीवन जगत आहे. मात्र, आजही त्या कलाविश्वात चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात.
दिप्ती यांचे वडील उदय सी नवल हे एक उत्तम चित्रकार होते. त्यामुळे आपल्या लेकीने सुद्धा याच क्षेत्रात यावं असं त्यांना वाटायचं. परंतु, दिप्ती यांना अभिनय क्षेत्रात रस होता. दिप्ती यांनी सुरुवातीला न्यूयॉर्कमधील एका युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षिका म्हणून काम केलं. त्यानंतर १० वर्षानंतर त्या भारतात परतल्या आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
प्रकाश झा सोबत केलं होतं लग्न
१९७८ मध्ये त्यांनी श्याम बेनेगल यांच्या जुनून या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर एका पाठोपाठ त्यांनी अनेक हिट सिनेमा बॉलिवूडला दिले. याच काळात त्यांची ओळख प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत झाली. ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी १९८५ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांनी एका मुलीला दत्तकही घेतलं. दिशा झा असं तिचं नाव. मात्र, १५ वर्षानंतर त्यांच्या नात्यात चढउतार आले आणि ही जोडी विभक्त झाली. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवन आणि घटस्फोट यावर भाष्य केलं होतं.
विनोद पंडीतवर जडलं प्रेम
प्रकाश झासोबत विभक्त झाल्यानंतर दिप्ती या अभिनेता विनोद पंडीत यांच्या प्रेमात पडल्या. थोडा आसमान या टीव्ही शोच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. या मालिकेत काम करत असताना ही जोडी प्रेमात पडली. मात्र, त्यांचं प्रेम खुलत असतानाच विनोद पंडीत यांचं कर्करोगामुळे निधन झालं.
आज एकाकी जीवन जगातेय दिप्ती नवल
दिप्ती नवल ७२ वर्षांच्या असून सध्या त्या एकट्याने आयुष्य जगत आहेत. अभिनयासह त्यांनी त्यांची चित्रकला आणि फोटोग्राफी या दोन्ही आवडही जोपासल्या आहेत. तसंच दिवंगत अभिनेता विनोद पंडीत यांच्या नावाने त्याचा चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा चालवतात. या ट्रस्टच्या माध्यमातून त्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत करतात. तसंच त्या अभिनय क्षेत्रातही सक्रीय असून २०२३ मध्ये आलेल्या गोल्डफिश या सिनेमात त्या झळकल्या होत्या.