सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असून नुकतेच अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण विवाहबंधनात अडकले आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर आता 'लव सोनिया' व 'स्लमडॉग मिलिनेयर' यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, फ्रिडा बऱ्याच कालावधीपासून कोरी ट्रॅनला डेट करत आहे. तो पेशाने फोटोग्राफर आहे. याच वर्षी एक सामन्यादरम्यान ते एकमेकांना किस करताना दिसले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रिडाला आता आपले रिलेशनशीप एक स्टेप पुढे न्यायचे आहेत. ते दोघेही रिलेशनशीपबाबत गंभीर आहेत. फ्रिडाला छोटे प्रायवेट अफेयर ठेवायचे आहेत. जिथे कुटुंबातील व जवळचे नातेवाईक उपस्थित असतील. फ्रिडाचा सहकलाकार व कोरीचा बेस्ट फ्रेंड अभिनेता अरूण पॉ़लमुळे त्यांची ओळख झाली आहे.फ्रिडाचे 'स्लमडॉग मिलिनेयर'मध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता देव पटेल याच्यासोबत अफेयर होते. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते विभक्त झाले.