टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री गुरप्रीत बेदी (Gurpreet Bedi) आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे गुरप्रीतने डिलिव्हरीच्या एक दिवस आधी प्रेग्नंसी फोटोशूट केलं. आणि दुसऱ्या दिवशी तिला मुलगा झाला. गुरप्रीत आणि तिच्या पतीने सोशल मीडियावर बाळाचं नावही रिव्हील केलं आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
'दिल ही तो है' फेम अभिनेत्री गुरप्रीतने सोशल मीडियावर लेकाचा फोटो शेअर केला आहे. चिमुकला आईवडिलांचं बोट धरुन झोपला आहे. यामध्ये त्याचा चेहरा मात्र दिसत नाही. गुरप्रीतने लेकाचं नाव 'अजाए बेदी आर्या' असं लिहिलं आहे. यासोबत तिने नावाचा अर्थही लिहिला आहे. अजाए हा जपानी शब्द असून याचा अर्थ ताकद असा आहे.
गुरप्रीतने २ एप्रिल रोजी लेकाला जन्म दिला. तिने प्रेग्नंसीदरम्यान अनेक फोटोशूट केले जे सोशल मीडियावर आहेत. २०२१ मध्ये गुरप्रीतने कपिल आर्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ४ वर्षांनी तिने गुडन्यूज दिली आहे. बाळाच्या आगमनानंतर दोघांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
गुरप्रीतला २०१८ साली आलेल्या 'दिल ही तो है' मालिकेतून लोकप्रियता मिळाली. यामध्ये ती करण कुंद्रासोबत दिसली होती. यासोबतच ती 'कबूल है २.०','प्यार के सात वचन धरम पत्नी','रक्तांचल','बँग बँग' या मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.