या अभिनेत्रीच्या ह्रदयाला बालपणापसून छिद्र, 'उजडा चमन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये तिची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 04:06 PM2019-11-01T16:06:53+5:302019-11-01T16:13:07+5:30

जन्मतः ह्रदयाला छिद्र असणारी डिफेक्टिव लेक जन्माला कशी घातली असा प्रश्न गंमतीने वडिलांना विचारत असल्याचे ऐश्वर्याने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

This actress has hole in her heart, made debut in Bollywood from Ujda Chaman film | या अभिनेत्रीच्या ह्रदयाला बालपणापसून छिद्र, 'उजडा चमन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये तिची एंट्री

या अभिनेत्रीच्या ह्रदयाला बालपणापसून छिद्र, 'उजडा चमन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये तिची एंट्री

googlenewsNext

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या सखुजानं त्रिदेवियाँ मालिकेतून रसिकांची मनं जिंकली. आता ऐश्वर्या उजडा चमन चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आहे. मात्र बालपणापासूनच ऐश्वर्याला एका आजाराने ग्रासलं आहे. तिच्या ह्रदयाला छिद्र असून डोळ्यांचीही समस्या तिला आहे. असं असतानाही ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. अनेक टीव्ही अभिनेत्रींचं रुपेरी पडद्यावर झळकण्याचं जे स्वप्न असतं ते तिने मेहनतीच्या जोरावर साकार केले आहे. 


इतका मोठं दुःख असूनही तिनं कधीही हार मानली नाही किंवा ती खचूनही गेली नाही. उलट यावरून ती आपल्या वडिलांशी मजा मस्करी करते. जन्मतः ह्रदयाला छिद्र असणारी डिफेक्टिव लेक जन्माला कशी घातली असा प्रश्न गंमतीने वडिलांना विचारत असल्याचे ऐश्वर्याने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 


ऐश्वर्या विविध आजारांनी त्रस्त आहे. मात्र त्याचं कधी भांडवल केलं नाही किंवा सहानुभूतीही मागितली नाही हेही तिने स्पष्ट केलं. या आजारांमधून लढण्याची किंबहुना जीवन जगण्याची प्रेरणा मिळाल्याचंही ती सांगते. आपल्या शरीराचा सन्मान करत असल्याचंही ती सांगते. आपण कामापेक्षा आरोग्याची काळजी घेणं आणि जगण्याचा आनंद घेण्याला प्राधान्य देत असल्याचे ऐश्वर्याने म्हटले आहे.  उजडा चमन चित्रपटात ऐश्वर्याच्या उत्तम अदाकारीची झलक पाहायला मिळते. 

Web Title: This actress has hole in her heart, made debut in Bollywood from Ujda Chaman film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.