मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. अभिनेत्रीच्या पेन शहरात असलेल्या घरावर चोरट्यांनीचोरी केलेली आहे. चोरी झाली तेव्हा घरी कोणीही नव्हते, त्यामुळे तिच्या घरातले व्यक्ती सुखरूप आहेत. पण, घरी अचानक चोरी झाल्याने त्याचा धक्का बसल्याने अभिनेत्रीच्या आईला बसला असून त्यांना अर्धांगवायूचा अटॅक आला. सध्या त्या रुग्णालयात आहेत.
जान्हवी किल्लेकर हिनं चोरीबाबत पेण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ज्या घरात चोरी झाली हे जान्हवी किल्लेकरचं हॉलिडे होम आहे. येथे सुट्टी किंवा विकेंडला जान्हवी आणि तिचे कुटुंबीय राहायला जातात. या घरातून चोरांनी स्पिकर्स, महागडी घड्याळं आणि अभिनेत्रीच्या आईच्या साड्या लंपास केल्या आहेत. जान्हवीनं सर्वांनी सतर्क व जागरूक राहण्याचा सल्ला दिलायं.
घरी चोरी झाल्याचं तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सांगितलं. ती म्हणाली, 'नमस्कार, आज अचानक व्हिडीओ बनवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे माझ्या बहुतेक चाहत्यांना आता माहितीये की, माझं पेणमध्ये एक घर आहे. लहानसा असा बंगला आम्ही अलीकडेच त्याठिकाणी बांधलाय. ते आमचं वीकेंड होम असून आम्ही फक्त शनिवार – रविवारी त्या घरी जातो. माझे आई – बाबा देखील वीकेंडला आमच्याबरोबर येतात. झालं असं की, या घरात नुकतीच चोरी झाली'.
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'आमच्या घरातून चोरांनी बऱ्याच मौल्यवान वस्तू जसं की स्पिकर्स, माझ्या भावाची गिटार, महागडी घड्याळं, माझ्या आईच्या साड्या अशा बऱ्याच वस्तू चोरीला गेल्या. त्या चोरांना जे नेणं शक्य झालं ते चोरून घेऊन गेले. एवढंच नव्हे तर या चोरांनी एसी काढण्याचा पण प्रयत्न केला. पण, कदाचित त्यांना ते जमलं नसावं. जर तुमचंही असं बंद घर असेल किंवा कुठे असं वीकेंड होम असेल तर, प्लीज काळजी घ्या. सध्या चोरांचा खूपच सुळसुळाट झाला आहे'.
'आपण अनेकदा खूप आवडीने गोष्टी घेतो. आमच्या घरसाठी अशाच काही वस्तू आम्ही घेतल्या होत्या. या काही खास वस्तू चोर घेऊन गेले. पेणचे पोलिस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत. पण, चोर सापडतील की नाही याची शाश्वती नाही. याचं कारण म्हणजे आम्ही फक्त वीकेंडला तिथे जातो. त्यामुळे नेमकी चोरी कोणत्या दिवशी झाली याची आम्हाला कल्पना नाही. माझ्या आईने या सगळ्या गोष्टींचं दडपण घेतल्यामुळे तिला अर्धांगवायूचा अटॅक (पॅरालिसिस) आला. अजूनही ती रुग्णालयात आहे. त्यामुळे तुमचंही असं बाहेर कुठे घर असेल तर काळजी घ्या'.