Join us

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, अभिनेत्रीला नक्की काय झालं होतं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 1:50 PM

जान्हवीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरची प्रकृती अन्नातून विषबाधा झाल्याने काही दिवसांपूर्वी खालावली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून जान्हवी कपूरचे चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत होते. आता जान्हवीच्या प्रकृतीबाबत  मोठे अपडेट समोर आले आहे. जान्हवीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जान्हवी कपूरच्या प्रकृतीबाबत वडील बोनी कपूर यांनी अपडेट दिलं आहे.  बोनी कपूर म्हणाले, 'शनिवारी सकाळी तिला डिस्चार्ज देण्यात आला. आता ती बरी आहे'.  बहीण खुशी कपूर आणि बॉयफ्रेंड शिखर पहारिया जान्हवीची काळजी घेत आहे. आता जान्हवीला डिस्चार्ज मिळाल्यामुळे तिचे चाहते खूप खुश आहेत.  जान्हवी चेन्नईला गेली होती. चेन्नईहून परतताना तिने विमानतळावर काहीतरी खाल्लं. ज्यातून तिला विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'उलझ' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजसाठी जान्हवी उत्सुक आहे. २ ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये तिने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. यंग डिप्लोमेट सुहाना असं तिचं कॅरेक्टरचं नाव आहे. तिच्याच भोवती सिनेमाची कथा फिरते. नुकताच सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडहॉस्पिटल