एकेकाळची हॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री यूकेतील डेम जोन कॉलिन्सने (Dame Joan Collins) त्यांच्या एका डॉक्यूमेंट्रीमध्ये खळबळजनक खुलासा केला आहे. कॉलिन्स यांनी सांगितलं की, त्यांच्या पहिल्या पतीने पहिल्याच डेटला त्यांच्यावर रेप (Actress Raped) केला होता. इतकंच नाही तर त्यांना ड्रग्सही दिलं होतं.
८८ वर्षीय जोन कॉलिन्स (Dame Joan Collins) यांनी एकूण ५ लग्ने केली. ज्यांबाबत त्यांनी त्यांच्या डॉक्यूमेंट्रीत सांगितलं. कॉलिन्स यांनी त्यांचे पहिले पती मॅक्सवेल रीडबाबत सांगितलं की, त्याने पहिल्याच डेटला त्यांच्यासोबत रेप केला होता आणि ड्रग्सही दिलं होतं. मॅक्सवेल त्यावेळी एक स्टार होता. रेपनंतर कॉलिन्सने मजबुरीत त्याच्यासोबत लग्न केलं होतं.
इतकंच नाही तर लग्नानंतर मॅक्सवेलने कॉलिन्सला विकण्याचाही प्रयत्न केला होता. इतकंच नाही वयोवृद्ध श्रीमंत पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासही त्यांना सांगितलं होतं. यासाठी त्याने प्रति रात्र १० लाख रूपये देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, कॉलिन्स यांनी या सर्व गोष्टींना नकार दिली आणि मॅक्सवेलची साथ सोडली.
कॉलिन्स यांचा खळबळजनक खुलासा
कॉलिन्स म्हणाल्या की, 'त्यावेळी मी व्हर्जिन होते. जेव्हा त्या सिने स्टार मॅक्सवेलसोबत डेटसाठी त्याच्या घरी गेल्या होत्या. त्याने ड्रिंकबाबत विचारलं. जेव्हा मी फ्रेश होण्यासाठी गेले तेव्हा त्याने रम आणि कोक मिक्स करून पिण्यास सांगितलं. काही पुस्तके वाचायला दिली. मी नशेत होते, यादरम्यान त्याने माझा रेप केला'.
यावेळी जॉन कॉलिन्स यांनी हेही सांगितलं की, कशाप्रकारे एकेकाळजी हॉलिवूड स्टार मर्लिन मुन्रोने त्यांना फिल्म इंडस्ट्रीतील वाईट लोकांपासून सावधान राहण्यास सांगितलं होतं. त्यांना लैंगिक हल्ल्यांबाबत सतर्क केलं होतं.
नंतर केली ५ लग्ने
मॅक्सवेल रीडनंतर कॉलिन्सने दुसरं लग्न ब्रिटीश अभिनेता एंथनी न्यूलीसोबत केलं होतं. पण काही वर्षातच हेही लग्न तुटलं आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर १९७२ मध्ये कॉलिन्स यांनी तिसरं लग्न रॉन काससोबत केलं होतं. कॉलिन्स यांनी १९८३ मध्ये घटस्फोट घेतला आणि गायक पीटर होम्ससोबत चौथं लग्न केलं. आता त्या त्यांचे पाचवे पती Percy Gibson सोबत राहतात. ते हॉलिवूड सिनेमांचे निर्माते आहेत.