बॉलिवूडमध्ये सध्या दीपिका पदुकोण, आलिया भट, करिना कपूर, क्रिती सेनन, कियारा अडवाणी या अभिनेत्रींचा डंका आहे. मात्र ९० च्या दशकात एका अभिनेत्रीने सर्वांचंच प्रेमात पाडलं होतं. तिच्या चुलबल्या स्वभावाने आणि उत्तम अभिनयाने तिने सर्वांचंच मन जिंकलं. अभिनेत्रीचा हा लहानपणीचा फोटो बघून तुम्ही अंदाज लावू शकाल. ही अभिनेत्री आज एका सुपरस्टारची पत्नी आहे. मात्र कधीकाळी ती अक्षय कुमारची चाहती होती.
फोटोत दिसणारी चिमुकली आज ओटीटीवरही लोकप्रिय ठरत आहे. ९० च्या दशकात तिच्या सिनेमांनी धुमाकूळ घातला होता. आजही तिचे चित्रपट सुपरहिट होतात. ही अभिनेत्री एका लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी आहे. मात्र लग्नाआधी ती अक्षय कुमारच्या मागे वेडी होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी ती मुंबईच्या रस्त्यांवर फिरायची. अभिनेत्रीला कुटुंबातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. या अभिनेत्रीची आई देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. याशिवाय तिच्या आजीनेही मनोरंजनसृष्टीत नाव कमावलं आहे. तर बहिणीनेही काही सिनेमात काम केलं आहे. ओळखलं का या अभिनेत्रीला?