Join us

लोकांच्या वाईट नजरा आणि अपशब्द! या कारणामुळे 28 वर्षांपूर्वी किमी काटकरने सोडले होते बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 6:23 PM

‘जुम्मा चुम्मा दे दे’ या लोकप्रिय गाण्यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झकळलेली किमी सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात राहते.

ठळक मुद्दे  चित्रपटातून एक्झिट घेतल्यावर किमी काटकरने लग्न केले आणि लग्न करून ती मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली.

बॉलिवूडमध्ये अनेक चेहरे आलेत, त्यांनी एक काळ गाजवला आणि अचानक आलेत तसे गायब झालेत. अनेकांना काही कारणास्तव त्यांना नाईलाजाने इंडस्ट्रीतून काढता पाय घ्यावा लागला. अभिनेत्री किमी काटकर यापैकीच एक. ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या लोकप्रिय गाण्यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झकळलेली किमी सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात राहते. पती शांतनू शौरी आणि मुलगा सिद्धांतसोबत ती आनंदात जगतेय.1985 साली ‘पत्थर दिल’ या सिनेमापासून किमीच्या अ‍ॅक्टिंग करिअरला सुरूवात झाली होती. 1992 मध्ये प्रदर्शित ‘हमला’ हा तिचा शेवटचा सिनेमा होता.

किमी काटकर ही अभिनेत्री  टिना काटकर यांची मुलगी. टिना काटकर या बॉलिवूड अभिनेत्री तसेच कॉस्टयूम डिझायनर म्हणूनही ओळखल्या जात. 

 60 आणि 70 च्या दशकातील वल्लाह क्या बात है, जवानी दिवाणी, चंगेज खान यासारख्या चित्रपटात टिना काटकर यांनी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. आईच्या पावलावर पाऊल टाकत किमी काटकर हिने देखील अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली होती. ‘पत्थर दिल’ या सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारल्यानंतर याच वर्षांत तिचा ‘टार्जन’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटात किमीने इतके बोल्ड सीन्स दिले होते की, यानंतर बोल्ड हिरोईन अशी तिची ओळख तयार झाली होती.

बोल्ड सिनमुळे हा चित्रपट तुफान हिट ठरला. यानंतर किमीला अनेक चित्रपटांची ऑफर येऊ लागली. मेरा लहू, दरिया दिल, सोने पे सुहागा, खून का कर्ज हे चित्रपट तिने साकारले पण यात म्हणावे तसे यश तिला मिळाले नाही. 1991 साली अमिताभ बच्चनची हिरोईन म्हणून ‘हम’ चित्रपट तिने साकारला. चित्रपटासोबतच त्यातील ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे तिच्यावर चित्रित झालेले गाणे देखील सुपरडुपर हिट ठरले होते. यानंतर किमी मोजून तीन चार सिनेमांत झळकली आणि त्यानंतर अचानक गायब झाली.

अनिल कपूर सोबतचा ‘हमला’ हा शेवटचा चित्रपट तिने  केला. किमीने बॉलिवूड का सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला होता.  एकदा   एका मुलाखतीत तिने यामागचे कारण सांगितले होते.

‘अनेकदा दुय्यम भूमिकाच माझ्या वाट्याला येत. या भूमिकांमुळे मला इतरांकडून चांगली वागणूक मिळत नसे. लोकांच्या वाईट नजरा आणि मागून अपशब्द तसेच टोमणे मारणे हे सगळे पाहून मी निराश झाले होते. मला या क्षेत्रात फारसा इंटरेस्ट राहिला नाह. त्यामुळे   मी चित्रपट स्वीकारणेच बंद केले, असे तिने सांगितले होते.  चित्रपटातून एक्झिट घेतल्यावर किमी काटकरने लग्न केले आणि लग्न करून ती मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली. तिचा मुलगा सिद्धांत याला देखील फोटोग्राफीची आवड आहे आणि यातच तो आपले करिअर घडवत आहे.  

टॅग्स :किमी काटकर