Join us

आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी किमी काटकर आता कशी दिसते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 12:07 PM

करिअर चांगलं सुरु असताना किमीने सिने इंडस्ट्रीचा निरोप घेतला. आता किमी काटकर का करते? कुठे राहते? हे जाणून घेऊ...

मुंबई : 80 च्या दशकात आपल्या हॉट अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री किमी काटकर आजही अनेकांना आठवत असेल. किमी काटकरने त्या काळातील सर्वच मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. किमीचा अभिनय कधी चर्चेत नव्हता पण किमीच्या बोल्डनेसमुळे ती नेहमी चर्चेत राहिली. पण करिअर चांगलं सुरु असताना किमीने सिने इंडस्ट्रीचा निरोप घेतला. आता किमी काटकर का करते? कुठे राहते? हे जाणून घेऊ...

किमी काटकरने 17 वर्षांची असताना मॉडलिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर तिला पहिला ब्रेक 'पत्थर दिल' या सिनेमातून मिळाला होता. पण हा सिनेमा फ्लॉप झाला होता. त्यानंतर किमी काटकरचा दुसरा सिनेमा 'टार्जन' हा होता. या सिनेमातील तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. या सिनेमातील हॉट सीन्समुळेच तिची बोल्ड अभिनेत्री अशी इमेज तयार झाली होती. 

किमी काटकरने त्या काळातील सर्वच स्टारसोबत काम केलं होतं. त्यात जितेंद्र, अनिल कपूर, गोविंदा यांच्यासोबत काम केलं. पण तिला जास्त प्रसिद्धी मिळाली ती अमिताभसोबत 'हम' सिनेमात काम केल्यावर. 1991 मध्ये रिलीज झालेल्या 'जुम्मा जुम्मा' हे या सिनेमातील गाणं फार गाजलं होतं.  

किमी काटकरने गोविंदासोबत बऱ्याच सिनेमात काम केलं. दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. पण अचानक किमीने सिनेमात करणं बंद केलं. दरम्यान किमीने प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनुसोबत लग्न केलं. 

सध्या किमी पती आणि मुलासोबत सुखाचं आयुष्य जगत आहे. अशातच आपल्या मुलाला एक गंभीर आजार असल्याचं किमीला कळालं. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी तिला सतत ऑस्ट्रेलियाला जावं लागायचं. काही काळ ती परिवारासोबत ऑस्ट्रेलियामध्येच राहत होती. 

किमीच्या मुलाचा आजार बरा झाल्यानंतर तिने भारतात परण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईऐवजी तिने पुणे शहरात राहणं पसंत केलं.  

टॅग्स :बॉलिवूडकिमी काटकर