अभिनेत्री लवीना लोधचा महेश भट्टवर खळबळजनक आरोप, म्हणाली - 'ड्रग्स सप्लाय करतो माझा पती सुमित!'
By अमित इंगोले | Published: October 24, 2020 09:42 AM2020-10-24T09:42:51+5:302020-10-24T09:46:19+5:30
लवीना लोधने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती सांगते आहे की 'महेश भट्टचा भाचा सुमित सभरवालसोबत तिने लग्न केलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून रोज बॉलिवूडबाबत कुणीना कुणी काहीतरी खुलासा करत आहे. आता अभिनेत्री लवीना लोधने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओत लवीनाने दावा केला आहे की, फिल्ममेकर महेश भट्ट तिला धमकी देत आहेत. लवीना लोधने तिच्या या व्हिडीओत खुलासा केला की, तिने महेश भट्टचा भाचा सुमित सभरवालसोबत लग्न केलं होतं आणि तिचा पती ड्रग्स सप्लाय करत होता. तिने सांगितलं की, हा व्हिडीओ तिच्या आणि तिच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी बनवला आहे.
लवीना लोधने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती सांगते आहे की 'महेश भट्टचा भाचा सुमित सभरवालसोबत तिने लग्न केलं होतं. नंतर मी घटस्फोटाची मागणी केली. कारण मला समजलं होतं की, तो सपना पब्बी आणि अमायरा दस्तूरसारख्या अभिेनेत्रींना ड्रग्स सप्लाय करतो. या सर्व गोष्टींची माहिती महेश भट्ट यांना आहे. महेश भट्ट इंडस्ट्रीतील सर्वात मोठा डॉन आहे आणि पूर्ण सिस्टम ऑपरेट करतो. जर तुम्ही त्यांच्या मनासारखा वागले नाही तर तुमचं जगणं हैराण करून सोडतात'.
'महेश भट्टने अनेकांचं आयुष्य उद्धवस्त केलं'
लवीनाने पुढे सांगितलं की, 'महेश भट्टने अनेक लोकांना कामाहून काढून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. ते एक फोन कॉल करता आणि लोकांची नोकरी जाते. जेव्हापासून मी त्यांच्या विरोधात केस दाखल केली आहे तेव्हापासून ते माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पोलिसातही गेले, तक्रारी केल्या पण काहीही कारवाई होत नाही'.
लवीना शेवटी म्हणाली की, 'जर पुढे माझ्यासोबत किंवा माझ्या परिवारासोबत काही झालं तर याला महेश भट्ट, मुकेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सहगल आणि कुमकुम सहगल हे जबाबदार असतील. लोकांना हे कळायला पाहिजे की, बंद दारामागे महेश भट्ट काय काय करतात. फार शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे महेश भट्ट'.
दरम्यान, लवीनाने २०१० मध्ये अभिनेता, गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाच्या 'कजरारे' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश भट्टची मुलगी पूजा भट्टने केलं होतं.