Join us

Bigg Boss च्या घरात या अभिनेत्रीने केली चक्क पॉर्नची मागणी, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 10:06 IST

Bigg Boss चा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देअनन्याला हेडफोन दिला असता सलमान म्हणाला बिग बॉस चाहते है... सलमानने लिपसिंग करून काय म्हटले हे तिला ओळखायचे होते त्यावर तिने बिग बॉस चाहते है म्हणण्याच्याऐवजी मैं पोर्न चाहती हूँ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला पती पत्नी और वो हा चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची एकही संधी या चित्रपटाची टीम सोडत नसून या चित्रपटाची टीम नुकतीच बिग बॉस या कार्यक्रमात प्रमोशनसाठी आली होती. 

बिग बॉसमध्ये पती पत्नी और वो या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावल्यावर या चित्रपटाच्या टीमसोबत या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खानने अनन्या, कार्तिक आणि भूमीसोबत मजा मस्ती केली. सलमानने या तिघांना एक टास्क दिला होता. पण या टास्कमध्ये अनन्या पांडेची चक्क जीभ घसरली. बिग बॉसच्या घरात 'मैं पॉर्न चाहती हूँ' असे म्हणतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सलमानने या कार्यक्रमात कार्तिक, अनन्या आणि भूमी या तिघांना एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये त्यांच्या कानाला हेड फोन लावले होते आणि हाय व्हॉल्यूम म्युझिक सुरू होते. या आवाजात समोरची व्यक्ती लिपसिंग करून काय सांगायचा प्रयत्न करते हे ओळखायचे होते. अनन्याला हेडफोन दिला असता सलमान म्हणाला बिग बॉस चाहते है... सलमानने लिपसिंग करून काय म्हटले हे तिला ओळखायचे होते त्यावर तिने बिग बॉस चाहते है म्हणण्याच्याऐवजी मैं पोर्न चाहती हूँ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 

अनन्याचे हे उत्तर ऐकून कार्तिकने तर तिची टर उडवण्याची संधी सोडली नाही. तो म्हणाला, हा... ती खूप पॉर्न पाहते. अनन्याने म्युझिक ऐकताना सलमान काय बोलतो आहे हे ओळखण्याचा सहा वेळा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी तिने चुकीचं उत्तर दिलं. मात्र अनन्या काय बोलत आहे हे सलमाननं एकाच प्रयत्नात ओळखलं. 

 

टॅग्स :बिग बॉससलमान खानपति पत्नी और वोकार्तिक आर्यनअनन्या पांडेभूमी पेडणेकर