Join us

अभिनेत्री मधुरा वेलणकर बनली लेखिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 2:15 PM

मधुराने तिचा हा आनंद सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर केला आहे. तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत.  ब्युटी विथ ब्रेन अभिनेत्री मधुरा वेलणकर आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे आहे. मधुरा आता लेखिका बनली आहे. तिने पुस्तक लिहीले आहे. लवकरच तिच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. तुर्तास मधुरा तिच्या नव्या इनिंगबाबत खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्द मधुराने तिचा हा आनंद सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर केला आहे. तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मधुरा वेलणकर तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रात आली. तिचे वडील प्रदीप वेलणकर हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनय क्षेत्र म्हटले की, तुम्हाला चित्रीकरणासाठी अनेक तास द्यावे लागतात. प्रदीप वेलणकर यांचे शेड्युल तर नेहमीच व्यग्र असायचे आणि हे सगळे मधुराने लहानपणापासून पाहिले आहे. पण तरीही तिला अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयक्षेत्राकडे वळली. तिचे आणि तिच्या वडिलांचे ट्युनिंग खूपच चांगले आहे. ती नेहमीच तिच्या वडिलांसोबत विविध विषयांवर गप्पा मारत असते. त्या दोघांनाही शास्त्रीय संगीत, खेळ याची खूप आवड आहे.

टॅग्स :मधुरा वेलणकर