Join us

Raj Kaushal Death : मंदिरा बेदीवर कोसळला दु:खाचा डोंगर, पती राज कौशल यांचं निधन  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 10:19 AM

Mandira Bedi Husband Raj Kaushal Death :अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देराज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती.

बॉलिवूडमधून आणखी एक दु:खद बातमी आली आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली. फिटनेस स्टार व बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदी ((Mandira Bedi) हिने आज (30 जून 2021) पतीला गमावले. मंदिराचा पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. (Mandira Bedi Husband Raj Kaushal Death)

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. प्यार में कभी कभी, अँथनी कौन है, शादी का लड्डू या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

मंदिरा बेदीने 1999 मध्ये राज कौशलसोबत लग्न केले. तिला 8 वर्षांचा मुलगा आहे. नुकतीच मंदिरा व राज यांनी एका 4 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते. मंदिरा व राज यांची पहिली भेट मुकूल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा एका ऑडिशनसाठी तिथे गेली होती तर राज त्यावेळी मुकूल यांच्याकडे अस्टिस्टंट म्हणून काम करत होते. इथून दोघांत प्रेम फुलले होते. 14 फेब्रुवारी1999 दोघेही लग्नबंधनात अडकले होते.

अभिनेता रोहित रॉयला शोक अनावर...अभिनेता रोहित रॉय याने राज यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. ‘पहाटे साडे चार वाजता राज आपल्यातून निधून गेला. त्याला हृदयविकाराचा झटका आला यावेळी तो घरीच होता. कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर रुग्णालयात नेण्याआधीच त्याने अखेरचा श्वास घेतला होता, असे रोहितने एका माध्यमाशी बोलताना सांगितले. सोशल मीडियावरही त्याने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘आतापर्यंत भेटलेली  सुंदर व्यक्ती.. तुम्ही लकी असाल तरच तुम्ही त्याला मित्र म्हणू शकाल. गुड बाय न म्हणतात तो निघून गेलाय. व्यक्त व्हायला माझ्याकडे शब्द नाहीत... माझ्या मित्रा, माझ्या भावा, खूप वाईट झालं... पुढच्या आठवड्यात भेटू असं म्हणत गेलो आणि आता तो पुढचा आठवडा कधीच येणार नाही...,असं म्हणत रोहितने राजच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलंय.

टॅग्स :मंदिरा बेदी