Join us

अभिनेत्री मानसी नाईकनं खरेदी केली आलिशान कार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 13:53 IST

अभिनयापेक्षा मानसी तिच्या म्युझिक अल्बम आणि सोशल मीडियावरील वावरामुळे सर्वाधिक वेळा चर्चेत येते.

'वाट माझी बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Manasi naik). अभिनयापेक्षा मानसी तिच्या म्युझिक अल्बम आणि सोशल मीडियावरील वावरामुळे सर्वाधिक वेळा चर्चेत येते.  पतीसोबतचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच ती तिच्या आयुष्यातील अनेक अपडेट्स सोशल मीडियावर देत असते. मानसीने अशीच पती प्रदीप खरेरासोबत एक मोठी घोषणा केलीये.  ती म्हणजे मानसीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालयं.  तिने एक गुड न्यूजचं शेअर केलीये. ही गुड न्यूज म्हणजेच नुकतीच मानसीने एक नवीकोरी आलिशान कार खरेदी केलीये. आणि याची घोषणा तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत केलीये. 

मानसीने ऑडी ही महागडी कार खरेदी केलीये. कारचं घरी स्वागत करतानाचा व्हिडीओ मानसीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलायं. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये Look Whose the New Audi Girl Welcome home  Baby  असं म्हंटलंय. सेलिब्रेटीहींसह चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप आहे. प्रदीप मुळचा हरियाणाचा आहे. या दोघांच्याही रिल्सचे बरेच चाहते आहेत. सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहतावर्गही आहे. 

टॅग्स :मानसी नाईक