सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. अनेक चित्रपटात एकत्र काम करून या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९९० साली त्या दोघांनी गोव्यातील मंगेशी मंदिरात लग्नगाठ बांधली. अशोक सराफ हे निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे निवेदिता यांच्यासोबत त्यांची फार जुनी ओळख होती. चित्रपटात एकत्र काम करत असताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते हे बहुतेकांना माहित आहे.
निवेदिता सराफ यांनी नुकताच एक त्यांचा सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं असाचं आहे. हा फोटो फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमातील एक सुंदर फोटो... चाहत्यांनी देखील त्यांच्या या फोटोवर कमेंट करत त्यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
मुलगा अनिकेतच्या जन्मानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. हंसगामीनी साड्यांचा व्यवसाय सांभाळत त्यांनी पुन्हा एकदा चित्रपट मालिकांमधून कमबॅक केले. अग्गबाई सासूबाई मालिकेनंतर सध्या त्या कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत रत्नमाला मोहिते हे पात्र साकारत आहेत. मात्र लवकरच त्या मालिकेतून एक्झिट घेणार अशी माहिती आहे.