Join us

अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 6:37 PM

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार निवेदिता सराफ यांनी स्वत:ला क्वॉरांटाईन करुन घेतला आहे. अग्ग बाई सासूबाई मालिकेची उर्वरित टीमचे रिपोर्ट निगेटिव्ह  आले आहेत. निवेदिता सराफ यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवल्यामुळे त्यांनी कोव्हिड-19ची टेस्ट करुन घेतली. दुर्दैवाने त्यांची ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. निवेदिता सराफ पॉझिटीव्ह आल्यानंतर 'अग्ग बाई सासूबाई'मधील इतर कलाकार गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. सुदैवाने त्यांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या. निवेदिता सराफ यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची टेस्टदेखील निगेटीव्ह आली आहे. 

टाईम्सच्या ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, निवेदिता यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 15 सप्टेंबरपासून मालिकेचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. लवकरच मालिकेची शूटिंग पुन्हा सुरु होणार आहे. तसेच निवेदिता सराफ यांचा क्वॉरंटाईन काळ संपल्यानंतर त्या पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहेत. 

माझी आई काळूबाईच्या सेटवर कोरोनाची लागणकाही दिवसांपूर्वी 'माझी आई काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान २० ते २२ जणांना कोरोनाची लागण झाली. मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

 

टॅग्स :निवेदिता सराफअग्गंबाई सासूबाई