Join us

Preeti Jhangiani Birthday Special : सध्या काय करतेय ‘छुई मुई सी’ गर्ल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 8:00 AM

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ या चित्रपटातील एक चेहरा होता अभिनेत्री प्रिती झंगियानी हिचा. वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात करणा-या प्रितीसाठी चित्रपटात येणे हा केवळ एक योगायोग होता.

ठळक मुद्देप्रिती सध्या कुटुंबासोबत मुंबईत राहते.  आपल्या मुलांच्या संगोपनात ती बिझी आहे.

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ या चित्रपटातील एक चेहरा होता अभिनेत्री प्रिती झंगियानी हिचा. वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात करणा-या प्रितीसाठी चित्रपटात येणे हा केवळ एक योगायोग होता. ‘मोहब्बतें’मुळे प्रिती लोकप्रिय झाली. पण आज ती बॉलिवूडमध्ये कुठेही नाही.  अर्थात सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे. इतक्या इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें’ गर्ल इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण होईल. आज याच प्रितीचा वाढदिवस

‘मोहब्बतें’ या चित्रपटानंतर प्रितीने बॉलिवूडमध्ये टिकून राहण्याचे बरेच प्रयत्न केलेत. एलओसी, आन, अनर्थ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. पण हे चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले आणि पाठोपाठ प्रितीला काम मिळणे बंद झाले. यासाठी प्रिती स्वत:ला जबाबदार धरते. ‘बॉलिवूडमध्ये मला मार्गदर्शन करणारे कुणी नव्हती. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला चित्रपटांची निवड करताना मी अनेक चुका केल्यात. पण म्हणून माझे करिअर पूर्णपणे अयशस्वी ठरले असे मी म्हणणार नाही,’असे एका मुलाखतीत प्रिती म्हणाली होती.

१८ आॅगस्ट १९८० रोजी मुंबईतील सिंधी कुटुंबात प्रितीचा जन्म झाला.  सर्वप्रथम राजश्री प्रोडक्शनच्या ‘ये है प्रेम’ मध्ये ती झळकली. त्यानंतर ‘छुई मुई सी तुम लगती हो’ आणि ‘कुड़ी जच गई’ या गाण्यात ती दिसली. या गाण्यांमुळे प्रितीला कमालीची लोकप्रियता मिळाली. पुढे प्रितीने  काही जाहिरातीही केल्या. पण जम बसत नाही म्हटल्यावर २००८ मध्ये तिने बॉलिवूड करिअर सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मॉडेल व अ‍ॅक्टर प्रवीण डब्बाससोबत तिने लग्नगाठ बांधली.   प्रितीचा पती प्रवीण अभिनेताव्यतिरीक्त स्कुबा ड्रायव्हिंगही करतो. त्याला अंडरवॉटर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचीही आवड आहे. २०११ मध्ये प्रितीने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव जयवीर आहे.यानंतर २०१६ मध्ये प्रिती दुसºयांदा आई बनली. बाळाचे नाव देव असे ठेवण्यात आले.

प्रिती सध्या कुटुंबासोबत मुंबईत राहते.  आपल्या मुलांच्या संगोपनात ती बिझी आहे. ३८ वर्षांची प्रिती आजही स्वत:ला फिट ठेवते.  प्रितीचा ‘मोहब्बतें’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. पण या चित्रपटातील किम शर्मा व शमिता शेट्टी यांच्यासारखेच प्रितीचे करिअरही फ्लॉप राहिले.

टॅग्स :प्रिती झंगियानी