Join us

"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 2:42 PM

रश्मिका मंदानाच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी रश्मिकाने परळीकरांशी मराठीत संवाद साधला. 

Rashmika Mandanna in Parali : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले आहे. परळी शहरामध्ये नाथ प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात थेट लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना पोहचली. आपल्या गोड मराठीत बोलून तिनं परळीकरांची मन जिंकली.

परळी शहरामध्ये मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नाथ प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं. वैद्यनाथ गणेश महोत्सव २०२४ ला गणपती आगमनाने सुरुवात झाली. या महोत्सवासाठी नामांकित सिनेतारकांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन पार पडलं. रश्मिका मंदानाच्या उपस्थित कर्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी रश्मिकाने परळीकरांशी मराठीत संवाद साधला. 

रश्मिका ही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी सुंदर दिसत होती. तिने केस बांधले होते, यावर ड्रेसला साजेसे कानातले घातले होते. परळीकरांशी बोलताना ती म्हणाली, "कसं काय परळी, कसे आहात? I Love You....मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार.  मला खूप चांगलं वाटलं.  मी जास्त बोलून तुमचा वेळ वाया घालवणार नाही. तर तुम्ही सगळे डान्स करा आणि एन्जॉय करा", असं ती म्हणाली.  

रश्मीका मंदानाशिवाय या कार्यक्रमाला अभिनेत्री क्रिती सनॉन हिनेदखील हजेरी लावली होती. यासोबतच मराठमोळा अभिनेता संकर्षण कराडे त्याचबरोबर  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तेजा देवकर, ऋतुजा जुन्नरकर, पूनम कुडाळकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. 

टॅग्स :रश्मिका मंदानाधनंजय मुंडेगणेशोत्सवगणेशोत्सव 2024बीडपरळी